ED Raids Hasan Mushrif House: हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घरावर छापे
ईडीने नेमके कोणत्या कारणास्तव मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकले याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कोल्हापूर (Kolhapur) येथील घरावर अंमलबजावणी संचालनालाने छापे टाकले आहेत. ईडीने नेमके कोणत्या कारणास्तव मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकले याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. मात्र, सकाळी 6 वाजलेपासून विविध पथके हसन मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाली आहेत. प्राप्त माहितीनुसार, सध्या तरी मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानीच छापे टाकल्याची माहिती आहे.
दरम्यान, प्रसारमाध्यांनी हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता अशी काही कारवाई सुरु असल्याचे मला कळले आहे. परंतू, नेमकी कोणत्या संदर्भात ही कारवाई, छापे सुरु आहेत हे समजू शकले नाही. आपण सध्या घरी नाही आहोत, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधीत असलेल्या कोल्हापूर आणि पुणे येथील विविध ठिकाणी ईडीने छापे टाकल्याची माहिती आहे. दरम्यान, एका कोणत्यातरी साखर कारखान्यात झालेल्या कथीत भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. मात्र, हा कारखाना नेमका कोणता याबाबत माहिती समजू शकली नाही. (हेही वाचा, Kolhapur DCC Bank: कोल्हापूर डीसीसी बँक अध्यक्षपदी हसन मुश्रीफ तर उपाध्यक्षपती राजू आवळे यांची बिनविरोध निवड)
ट्विट
दरम्यान, सांगितले जात आहे की, अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील कथीत 1500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावरुन ही छापेमारी झाल्याचे समजते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता की, अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात भ्रष्टाचार करुन हसन मुश्रीफ यांनी मनी लॉन्ड्रींग करुन पैसे कमावले. याच्याशी त्यांचा जावई संबंधीत आहेत, असा आरप सोमय्या यांनी केला आहे.