IPL Auction 2025 Live

Sharad Pawar Party Name: शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळाले पक्षाचे नाव घ्या जाणून

पवार गटाने दाखल केलेल्या तीन पर्यायांपैकी एका नावावर आयोगाने शिक्कामोर्तब केले. प्राप्त माहितीनुसार, या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' हे नाव (Sharad Pawar Party Name) मिळाले आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

Nationalist Congress Party - Sharad Chandra Pawar: शरद पवार यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) नाव दिले आहे. पवार गटाने दाखल केलेल्या तीन पर्यायांपैकी एका नावावर आयोगाने शिक्कामोर्तब केले. प्राप्त माहितीनुसार, या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' हे नाव (Sharad Pawar Party Name) मिळाले आहे. अर्थात, उर्वरीत दोन नावांपैकी एखाद्या नावाचा विचार निवडणूक आयोगाने का केला नसावा याबाबत माहिती मिळू शकली नाही. पक्षाच्या नावात शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख असावा, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात होता. त्यावरुनच आयोगाकडे हे नाव सादर करण्यात आले होते. ज्याला तात्पूरत्या स्वरुपात मान्यता मिळाल्याचे समजते.

नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार नावावर शिक्कामोर्तब

राज्यसभा निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. अल्पावधीतच राज्यसभा उमेदवार आपली उमेदवारी दाखल करतील. या पार्श्वभूमीवर  शरद पवार गटाने लवकरात लवकर आपले पर्याय आम्हाला सादर करण्यात यावेत. हे पर्याय 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत हे पर्याय देण्यात यावेत अन्यथा शरद पवार गटास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल, असेही भारती निवडणूक आयोगाने म्हटले होते. त्यानुसार 1) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरद पवार, 2) नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार, 3) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी -एस असे तीन पर्याय आयोगाला देण्यात आले होते. (हेही वाचा, नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार नावावर शिक्कामोर्तब)

'शरद पवार हाच पक्ष आणि चिन्ह'

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करतो. मात्र, या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येताच शरद पवार गटातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. देशामध्ये सध्या हुकुमशाही सुरु आहे. जाणीवपूर्व केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांचा आवाज संपवला जातो आहे. ज्या ठिकाणी विरोधकांचा आवाज संपत नाही तिथे थेट पक्षच संपविण्याचा डाव रचला जातो आहे, अशी भावना शरद पवार गटातील नेत्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पक्ष आणि चिन्ह काढून घेण्यात अले असले तरी, शरद पवार हाच आमचा पक्ष आणि तेच आमचे चिन्ह आहे, अशी भावनाही या गटातील नेत्यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना पक्षात झालेल्या नाव आणि चिन्हाच्या वादात निवडणूक आयोग ज्या मार्गाने गेला. त्याच मार्गाने आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रकरणातही गेल्याचे पाहायला मिळत आहे. या वादातही शिवसेना हे पक्षनाम आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाकडे तीन पर्याय मागितले होते. त्यापैकी एक शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर आयगाने शिक्कामोर्तब केले. ज्यामुळे आज शिवसेना (UBT) हे नाव प्रचलित झाले आहे.