Lok sabha Election 2024: वृध्द आणि दिव्यांग मतदारांना घरपोच मतदानाचा पर्याय उपलब्ध, जिल्ह्याधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली माहिती
सुहास दिवसे यांनी घोषणा केली आहे की, भारत निवडणूक आयोगाने ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग व्यक्ती आणि ८५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 'सक्षम' अॅप सुरु केले आहे.
Lok sabha Election 2024: पुण्याचे जिल्ह्याधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घोषणा केली आहे की, भारत निवडणूक आयोगाने 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांग व्यक्ती आणि 85 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 'सक्षम' अॅप सुरु केले आहे. मात्र, वैयक्तिकरित्या मतदानाचा हक्क बजावू इच्छिणाऱ्यांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक ती व्यवस्था केली जाईल.
सक्षम अॅप अंपग मतदारांना अपंग म्हणून नोंदणी करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, मते हस्तांतरित करणे, मतदान केंद्रांमध्ये बदल करण्याची विनंती करणे आणि व्हीलचेअर मदत करणे, मतदार यादीतील नावे शोधणे, मतदान केंद्राचा तपशील तपासणे, तक्रारी नोंदवणे आणि बूथ लोकेटर स्थितीत प्रवेश करण्यास सक्षम अॅप सेवा देते.
दिव्यांग व्यक्तींसाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर असतील, पिण्याचे पाणी, वेटिंग शेड, वैद्यकीय कीट, सुलभ शौचालये, रॅम्प , व्हीलचेअर सुविधा, प्राधान्य प्रवेश, स्वतंत्र रांगेची सुविधा, मानक चिन्हे आणि यांसारख्या सुविधांनी सुसज्ज असतील. स्वयंसेवत मदत, अंध आणि शारिरिकदृष्ट्या विकलांग मतदारांसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सवर (ईव्हीएम) ब्रेल आणि व्होट बुक सुविधा उपलब्ध असेल.
या अॅपसाठी कोण पात्र?
अंधत्व, कमी दृष्टी,बहिरेपाणा, श्रवणदोष, शारिरिक अंपगत्व, मानसिक आजार, कुष्ठरोग, बौध्दिक अंपगत्व, सेरब्रल पाल्सी, मस्क्यूलर डिस्ट्रोफी, अॅसिड हल्ल्याचे बळी, बोलणे आणि भाषेचे अंपगत्व,ऑटिझम स्पेक्ट्रम यासह विविध अंपगत्व असलेल्या व्यक्ती विकार, क्रॉनिक न्युरोलॉजिकल जिसऑर्डर, रक्त विकार आणि एकाधिक अपंगत्व असलेले या अॅपच्या नोंदणीसाठी पात्र आहेत.