Worli Vidhan Sabha Constituency: वरळी मध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरूद्ध शिवसेना Milind Deora यांना उमेदवारी देणार?

मिलिंद देवरा यांच्याकडे लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरळी मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

milind deora | Twitter

आगामी महाराष्ट्र  विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं आहे. वरळी विधानसभेसाठी (Worli Vidhan Sabha Constituency) महाविकास आघाडी कडून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांना दुसर्‍यांदा उमेदवारी देण्यात आली आहे पण त्यांच्या विरूद्ध महायुती कडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. भाजपाच्या शायना एसी सोबतच आता आदित्य समोर शिवसेना राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora)  यांच्या नावाची चर्चा आहे.

आदित्य ठाकरे यांनी काल (23 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर आता महायुती कडून कोण आव्हान देणार याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान मनसे कडून आदित्य ठाकरेंविरूद्ध राज ठाकरेंनी नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. Vidhan Sabha Election Nomination: मुहूर्ताला गाठ, आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते दाखल करणार उमेदवारी अर्ज .

कोण आहेत मिलिंद देवरा?

मिलिंद देवरा हे मूळचे कॉंग्रेसचे आहेत. देवरा कुटुंबाचे 55 वर्षांचे कॉंग्रेस सोबतचे संबंध तोडून  आता त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. मिलिंद देवरा यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना शिवसेनेकडून  राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. यापूर्वी मिलिंद देवरांनी दक्षिण मुंबई मधून 3 वेळेस लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. अवघ्या 27 व्या वर्षी ते  खासदार झाले होते. उच्च शिक्षित आणि सुसंकृत चेहरा म्हणून मिलिंद देवरा यांच्याकडे सध्या पाहिलं जात आहे.   कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद त्यांनी यापूर्वी भूषवलं आहे.

देवरा यांच्याकडे लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरळी मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आमदार आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असूनही, वरळी विधानसभेत ठाकरेंकडे केवळ 6500 मतांची आघाडी होती.