Eknath Shinde यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सांभाळणार जबाबदारी
आता विधानसभेच्या 2024 च्या निवडणूकीमध्ये भाजपा ने राज्यात 132 शिवसेनेने 57 आणि एनसीपीने 41 जागा जिंकल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election) महायुतीला एकतर्फी यश मिळाल्यानंतर आता नव्या सरकार स्थापनेकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. यामध्ये आज विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला आहे. राजभवनावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती मध्ये त्यांनी Governor CP Radhakrishnan यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढील सरकार स्थापनेपर्यंत एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री (Caretaker Maharashtra Chief Minister) राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता 14 वी विधानसभा देखील विसर्जित झाली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय नाट्यानंतर 2022 साली एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. महायुती मध्ये भाजपा कडे अधिक जागा असून देखील शिवसेना पक्षामध्ये बंड करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वामध्ये 40 आमदार त्यांच्यासोबत आले होते. त्यामुळे महायुतीचं सरकार येताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी आशा असताना भाजपाने सार्यांनाच धक्का देत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची खूर्ची दिली. त्यानंतर एकनाथ शिंदेंनीही आपली जबाबदारी पार पडली. पण आता 2024 च्या विधानसभा निवडणूकी नंतर एकनाथ शिंदेंना काय जबाबदारी दिली जाणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. Eknath Shinde Thanks Voters: 'राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले, हा विजय सर्वसामान्यांचा आहे;' विधानसभा निवडणुकीतील यशानंतर एकनाथ शिंदेंनी मानले मतदारांचे आभार.
शिवसैनिकांकडून पुन्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं अशी भावना व्यक्त केली जात आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाची घोषणा ही महायुती मधील शिवसेना, भाजपा आणि एनसीपी हे तिन्ही पक्ष एकत्र बसून घेणार असल्याचं संगितलं जात आहे. अद्याप नव्या सरकार मधील सत्तावाटपाची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही मात्र येत्या काही दिवसांत त्याचा निर्णय होईल.
आता विधानसभेच्या 2024 च्या निवडणूकीमध्ये भाजपा ने राज्यात 132 शिवसेनेने 57 आणि एनसीपीने 41 जागा जिंकल्या आहेत.