Eknath Shinde On Milind Deora: मिलिंद देवरा यांच्या शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करण्याच्या अटकळांवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'जर ते पक्षात प्रवेश करत असतील तर...'

त्यांचा हा निर्णय काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटातील लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेमुळे असमाधानी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: ANI/X)

Eknath Shinde On Milind Deora: महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. दरम्यान, आता देवरा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, 'मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश होत आहे, असे मी ऐकतोय. अद्याप मला माहीत नाही. पण ते पक्षप्रवेश करणार असतील तर मी त्यांचे स्वागत करतो.'

मिलिंद देवरा यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा जाहीर केला. त्यांचा हा निर्णय काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटातील लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेमुळे असमाधानी असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Milind Deora Quits Congress: 'मी विकासाच्या मार्गावर जात आहे' कॉंग्रेसला सोडचिठ्ठीनंतर मिलिंद देवरा यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video))

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये देवरा यांनी म्हटलं आहे की, 'आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वपूर्ण अध्यायाचा समारोप होत आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपवून मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा अनेक वर्षांपासून अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.'

दरम्यान, मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. या वृत्तांवर भाष्य करताना देवरा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अद्याप निर्णय घेतलेला नाही. विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिल्यानंतर तीन दिवसांनी ही घटना घडली आहे.

तथापी, मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर आगमन झाले आहे. थोड्याच वेळात ते शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करणयाची शक्यता आहे.