Eknath Shinde Discharged: एकनाथ शिंदे यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयातून डिस्चार्ज; जाणून घ्या प्रकृतिची स्थिती

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला.

Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Health News) यांना मुंबईतील ज्युपिटर रुग्णालयातून (Jupiter Hospital Updates) डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिंदे यांना गेल्या आठवड्यापासून घशाचा संसर्ग आणि ताप होता, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या स्थितीत कोणतीही सुधारणा दिसून येत नव्हती. दरम्यान, त्याची लक्षणे पाहिल्यानंतर डॉक्टरांनी सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी शिंदे यांच्या तब्येतीबाबत भाष्य करताना म्हटले की, ते (एकनाथ शिंदे) निवडणुकीदरम्यानही आजारी होते. परंतू, त्यांनी पूर्ण ताकदीने प्रचार करत राहिले. गावाला भेट दिल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली, ज्यामुळे ते वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्याला परतले.

राजकीय घडामोडींदरम्यान प्रकृतीची आव्हाने

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीच्या कारणाने चिंता निर्माण झाल्या होत्या. मुंबईतील आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या नवनिर्वाचित महायुति सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शिंदे यांची प्रकृती त्यांच्या समर्थकांसाठी काळजीचा विषय ठरली होती. (हेही वाचा, Eknath Shinde Health Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने वैद्यकीय चाचणी साठी Jupiter Hospital मध्ये दाखल (Watch Video))

विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय

20 नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुति आघाडीने 288 सदस्यांच्या विधानसभेत 230 जागा जिंकून विजय मिळवला. भाजपने 132 जागा जिंकल्या, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. (U)

रुग्णालयातून बाहेर पडताना एकनाथ शिंदे

शिंदे यांना विश्रांती घेण्याचा सल्ला

एकनाथ शिंदे यांना पूर्ण बरे वाटण्यासाठी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. व्यग्र राजकीय वेळापत्रकात असतानाही त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. दरम्यान, शपथविधी सोहळा जसजसा जवळ येत आहे, तसतशी शिंदेंची प्रकृती चांगली होणे हे महायुती सरकारच्या नव्या कार्यकाळाच्या सुरुवातीस महत्त्वाचे आहे.

दरम्यान, ज्युपीटर रुग्णालयातून बाहेर पडताच एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले. वर्षा बंगला हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. महायुती सरकारला राज्यातील जनतेने पुन्हा एकदा समर्थन दिल्याने नवे सरकार सत्तेवर येऊ घातले आहे. दरम्यान, विधानसभेचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले तरी राज्याला अद्यापही सरकार मिळाले नाही. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. त्यामुळे महायुतीचे घोडे अडले आहे. दरम्यान, मुंबई येथील आझाद मैदानावर उद्या नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीकडून अद्यापही मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर झाले नाही. भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच प्रमुख दावेदार समजले जात असले तरी, एकनाथ शिंदे यांनीही आपला दावा मागे घेतला नाही. त्यामुळे उद्याच्या संभाव्य शपथविधीत मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार याबाबत उत्सुकता आहे.