एकनाथ खडसे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता जोडो अभियान लवकरच सुरु करणार- अनिल महाजन

त्यासोबतच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा ए.एम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन (Anil Mahajan) यांच्या संकल्पनेतून नाथाभाऊ समर्थक जोडो अभियानही जळगावात लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात कार्यकर्ता जोडो अभियान सुरु करण्यात येणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा ए.एम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन (Anil Mahajan) यांच्या संकल्पनेतून नाथाभाऊ समर्थक जोडो अभियानही जळगावात लवकरच सुरु करण्यात येणार आहे. एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या सर्व नवीन फळीच्या कार्यकर्त्यांना व जुन्या जानकार राजकीय लोकांना पुन्हा संघटित सक्रिय करून एकत्र करण्यासाठी नाथाभाऊ समर्थक जोडो अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे, अशी माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

एकनाथ खडसे यांच्यावर भारतीय जनता पार्टीने कसा अन्याय केला हे सर्वश्रूत आहे. एकनाथ खडसे यांना ज्येष्ठत्व आणि कार्य असतानाही मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून डावलले गेले. ज्यांच्या जीवावर भाजपने राज्यात एकतर्फी सत्ता मिळवली अशा व्यक्तीला भाजप व भाजपने योग्य न्याय दिला नाही. तर तुमच्या-आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे काय होणार. चाळीस वर्ष भाजप पक्षाची सेवा करणाऱ्याला भाजप पक्षातून बेदखल करतो तर तुम्हाला आम्हाला काय नाय देणार? असा सवाल विचारत अनिल महाजन यांनी नाथाभाऊ समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता जोडो अभियान सुरु करण्याचे ठरवले आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ तर 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. जळगाव जिल्ह्यातील तालुकांच्या विचार करायचा तरे त्यांची संख्या 15 आहे. सर्व तालुक्यांमध्ये नाथाभाऊ खडसे यांना मानणारा गट मोठ्या प्रमाणात आहे. नवीन फळीच्या सर्व कार्यकर्त्यांना तरुणांना नाथाभाऊ खडसे यांचे कार्य व बहुजन समाजा बद्दलची तळमळ सांगण्यासाठी खडसे समर्थक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यकर्ता जोडो अभियान हे सुरू करण्यात येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif