Eknath Khadse News: हृदयविकाराच्या धक्क्यातून एकनाथ खडसे सावरले, प्रकृती सुधारताच मानले हितचिंतकांचे आभार
मध्यंतरीच्या काळात त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला होता. ज्यामुळे त्यांना ततडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी हितचिंतकांचे आभार मानले आहेत. मध्यंतरीच्या काळात त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला होता. ज्यामुळे त्यांना ततडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत आहे. अत्यंत आणिबाणीच्या अशा काळात नागरिक, आरोग्य यंत्रणा आणि दृश्य-अदृश्य हितचिंतक आणि मदतगार व्यक्तींनी दिलेल्या प्रेमाबद्दल खडसे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. सोशल मीडिया मंच एक्स द्वारे पोस्ट लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'पूर्णपणे बरा होऊन आपल्या लवकरच सेवेत रुजू होईल'
एकनाथ खडसे यांनी आपल्या एक्स हँडलवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद! दरम्यान, त्यांनी आजपासून सुरु होत अलेलेल्या दिवाळी सणानिमित्त नागरिकांना शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधु-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
खडसे यांना जळगाव येथे असताना हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी हवाई रुग्णवाहीकाही मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करुन दिली होती. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे.
एकनाथ खडसे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव
एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणातील महतत्वाचे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेतील आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी ते भारतीय जनता पक्षाचे नेते होते. या पक्षात त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले. संघटनात्मक पातळीवर विविध पदे भूषवली, ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते राहिले आहेत. तसेच, मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते तब्बल 12 खात्यांचे मंत्री होते. इतकेच नव्हे तर त्यांना क्रमांक दोनचे नेते आणि मंत्री म्हणूनही ओळखले जात असे. मात्र, भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला.