गोपीनाथ मुंडे- छगन भुजबळ जोडीची ओबीसी लढा पुनरावृत्ती एकनाथ खडसे-छगन भुजबळ आगामी काळात करणार - माळी समाज नेते अनिल महाजन यांनी व्यक्त केला विश्वास
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नाथाभाऊ खडसे यांच्या रूपाने नवसंजीवनी मिळाली असल्याचं माळी समाज नेते अनिल महाजन यांनी म्हटलं आहे.
गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांची जोडीची ओबीसी लढा पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे.ओबीसी साठी माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknath Khadse) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची जोडी आगामी काळात ओबीसी लढा देणार. छगन भुजबळ यांना गोपीनाथ मुंडे यांच्या जागेवर ओबीसी लढा देण्यासाठी नाथाभाऊ खडसे यांच्या रूपाने एक भाऊ मिळाला आहे. वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आतापर्यंत विधानसभेत गरजलेला महाराष्ट्रच्या राजकारणात अभ्यासू व मुरलेला नेता म्हणजे एकनाथराव खडसे. माळी समाज महामंडळाचे अध्यक्ष माळी समाजाचे राज्याचे नेते अनिल महाजन (Anil Mahajan) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारा अपलं मत मांडलं आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला नाथाभाऊ न्याय देतात. त्यामुळे नवयुवक तरुण पिढी व जळगाव जिल्ह्यातील अनेक जेष्ठ समाज बांधव यांना नाथाभाऊ यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण नाथाभाऊ खडसे दूरदृष्टी आणि विकासपुरुष नेता आहे. यामुळेच जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या रुपाने एक संजीवनी मिळाली आहे.
एकनाथराव खडसे म्हणजे राजकारणात असलेले एक वटवृक्ष आहे. या वटवृक्षाची सावली अनेकांनी आतापर्यंत घेतली आहे. राज्यात भाजपाला चांगले दिवस जे आज बघायला मिळालेत ते फक्त आणि फक्त नाथाभाऊ यांच्या मुळे आहेत. ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. नुकताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा झाला अतिशय चांगला प्रतिसाद अजितदादा यांच्या दौऱ्याला मिळाला या दौऱ्यादरम्यान आगामी काळात जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होणार आहे आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ,बाजार समित्या या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहणार आहे आणि खानदेशातील सर्व निवडणुका नाथाभाऊ यांच्या नेतृत्वात लढवले जातील व नाथाभाऊ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुढील वाटचाल असणार आहे. खानदेश पट्ट्यात असे अधिकृत पणे अजित दादा पवार यांनी जाहीर केले व संकेत दिले आहे.
नुकतीच जळगाव जिल्हा बॅंक एकतर्फी राष्ट्रवादी कडे आणून दाखविले जिल्ह्यात पक्षात अनेक लोकप्रतिनिधीचे प्रवेश सुरू आहेत. नगरसेवक असतील समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील हे सर्व लोक नाथाभाऊ यांच्या विश्वावासावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे.
नाथाभाऊ यांच्यासह यांच्या कुटूंबाला भाजप पक्षाने किती त्रास दिला अजूनही देत आहे.एक चांगला नेता घडायला अनेक वर्षे लागत असतात आपल्यावर केलेले उपकाराची भाजप नेत्यानी थोडीही जाणीव केली नाही याची खंत नाथाभाऊ यांना आहे.
पण नाथाभाऊ खडसे हे डगमगणारे व्यक्ती नाहीत. देशाचे नेते फुले, शाहू ,आंबेडकर, विचारसरणीचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा आशीर्वाद घेऊन व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे पूर्ण सहकार्य घेऊन ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या खांद्याला खांदा लावून बहुजनांचा लढा देण्यासाठी ओबीसीचे रद्द केलेली राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत व आगामी काळात राजकारणात मोठी उलथापालथ एकनाथराव खडसे हे राज्यात करतील असे संकेत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2021 11:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

