Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांचीतस्करी केल्याप्रकरणी मुंबईतील आठ जणांना अटक, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
सर्व एकत्रितपणे 1.2 लाख किमतीचे अंमली पदार्थ हस्तगत केले आहे. आठही जण मुंबईतील भांडुप (Bhandup) पश्चिम येथील आहेत. ते येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते.
गोव्यात (Goa) अंमली पदार्थांची (Drugs) तस्करी केल्याप्रकरणी मुंबईतील आठ जणांना शनिवारी अटक (Arrest) करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांना उत्तर गोव्यातील आरंबोल (Arambol) गावातून गुप्त माहितीच्या आधारे इंस्पेक्टर जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखालील पेरनेम पोलिसांच्या (Pernem Police) पथकाने ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून 88 ग्रॅम गांजा, 34 ग्रॅम चरस, 60 गांजाच्या बिया आणि एलएसडी ब्लॉट्ससह अमली पदार्थ जप्त केले. सर्व एकत्रितपणे 1.2 लाख किमतीचे अंमली पदार्थ हस्तगत केले आहे. आठही जण मुंबईतील भांडुप (Bhandup) पश्चिम येथील आहेत. ते येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते.
या प्रकरणात अॅलेक्स रोमियो, जेफ्री रॉड्रिग्स, सागर जाधव, एड्रियन किंग्स्टन, रोहित झेंडे, रुषिकेश महाडिक, वैभव शिगवण, प्रेम लोंढे, यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस कर्मचार्यांनी संभाव्य ग्राहक म्हणून भासवून स्थानिक रिसॉर्टमधील एका खोलीत छापा टाकून रॅकेटचा पर्दाफाश केला, असे दळवी यांनी सांगितले. हेही वाचा Thane: देवळातील पैशांची पेटी चोरण्यासाठी भामट्याने लढवली शक्कल, आधी पडला पाया नंतर मारला डल्ला
आरोपींचा कसून शोध घेण्यात आला, आणि त्यांच्याकडे विविध प्रकारचे ड्रग्ज असून ते पर्यटकांना ड्रग्ज पुरवत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून 1.2 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे,’ असे दळवी यांनी सांगितले. दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक होते, तर पीएसआय प्रफुल्ल गिरी आणि हरीश वायगुणकर, हेडकॉन्स्टेबल उदय गोसावी, अर्जुन कलंगुटकर, स्वप्नील शिरोडकर, विनोद पेडणेकर, भास्कर चारी यांनी सहकार्य केले.