Egg Price | (Representative Image, Photo Credit: Pixabay.com)

Egg Price Rise Reason: उन्हाळा संपला असून पावसाळा सुरु झाला. दरम्यान, उष्णता कायम असली तरी अंडी दराने (Egg Price) मात्र वधार दाखवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई शहरातील अंड्यांच्या किमती (Egg Rate Mumbai) प्रति डझन 78 ते 90 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. उष्णतेच्या लाटेचा परिणाम, पावसाळ्यातील व्यत्यय, वाढती मागणी आणि निर्यात यामुळे किरकोळ आणि घाऊक दर (Egg Price Hike 2025) पाच वर्षांच्या उच्चांकावर आहेत. राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने (NECC) जून 2025 मध्ये प्रति शेकडा म्हणजेच100 अंड्यांसाठी 589.64 रुपये असा घाऊक किमतीचा अहवाल दिला आहे, जो गेल्या पाच वर्षातील जूनमधील सर्वाधिक दर आहे.

किरकोळ आणि ऑनलाईन बाजारातही दर चढेच

मुंबई शहरांतील विविध ठिकाणी बुधवारी (25 जून) नोंदविलेल्या किरकोळ  विक्रीच्या आकडेवारीमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स (अंधेरी) मध्ये  90 रुपये प्रति डझन, वांद्रे आणि बोरिवलीमध्ये 80 रुपये आणि वसईमध्ये 78 रुपये प्रति डझन अंडी विकली जात असल्याचे दिसून आले. त्या तुलनेत, मे महिन्यात किमती 68 ते 78 रुपयांदरम्यान होत्या. चेंबूर आणि कांजूरमार्गमधील ऑनलाइन खरेदीदारांनी प्रति डझन 117 रुपयांपर्यंत पैसे दिले आहेत, तर सहा 'विशेष अंडी' असलेल्या पॅकची किंमत 57 रुपये आहे. (हेही वाचा, What Indians Are Eating: देश चालतोय दुधावर, चिकन आणि अंड्याचाही वापर वाढला; भाज्या ताटातून बाहेर पडण्याची भीती- Food Consumption Survey)

घाऊक बाजारात मोठी वाढ

घाऊक किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत मार्चमध्ये अंडी प्रति शेकडा (100) 470 रुपयांवरून जूनमध्ये 591 रुपयांपर्यंत दर वाढले आहेत. पुण्यातही असाच ट्रेंड दिसून आला आहे, गेल्या दोन आठवड्यात किरकोळ किमती 66 रुपयांवरून 84 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत, तर घाऊक किमती 485 रुपयांवरून 601 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने (NECC) जून 2025 मध्ये प्रति शेकडा म्हणजेच 100 अंड्यांसाठी 589.64 रुपये असा घाऊक किमतीचा अहवाल दिला आहे, जो गेल्या पाच वर्षातील जूनमधील सर्वाधिक दर आहे. (हेही वाचा, Chicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर)

कुक्कुट विक्रेते आणि शेतकरी या वाढीचे कारण अनेक घटकांना देतात. मुंबईतील एका अंडी विक्रेत्याने सांगितले की, की उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे अंडी उत्पादनात घट झाली. 'शेतकऱ्यांना नवीन पिल्ले परिपक्व होण्याची वाट पहावी लागते आणि तरीही अंडी लहान असतात,' असे ते म्हणाले. पुढील 15 ते 20 दिवसांत किमती स्थिर होतील अशी अपेक्षा पासवान यांना आहे. दुसऱ्या एका विक्रेत्याने सांगितले की, सध्या मागणी प्रचंड वाढली आहे. शाळा पुन्हा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी न्याहारी आणि टिफिनसाठी अंड्यांची गरज वाढली आहे. शिवाय पुढील महिन्यात श्रावण सुरु होणार असल्यामुळे अनेक लोक आत्ताच जास्त अंडी खरेदी करत आहेत.