Money Laundering Case: मनी लाँडरिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई; महाराष्ट्रस्थित स्टील कंपनीची 517 कोटींची मालमत्ता जप्त

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत या मालमत्ता जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी करण्यात आला असून त्यांची एकूण किंमत 517.81 कोटी रुपये आहे.

Enforcement Directorate | (File Image)

Money Laundering Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी 895 कोटींहून अधिक रुपयांच्या कथित बँक कर्ज फसवणुकीप्रकरणी मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत महाराष्ट्रस्थित स्टील कंपनीची (Steel Company) 517 कोटींहून अधिक मालमत्ता जप्त केली आहे. जमीन, इमारत आणि यंत्रसामग्रीसह मालमत्ता एसकेएस इस्पात आणि पॉवर लिमिटेडच्या मालकीची असल्याचंही ईडीने सांगितलं आहे.

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत या मालमत्ता जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी करण्यात आला असून त्यांची एकूण किंमत 517.81 कोटी रुपये आहे. तिरुचिरापल्ली येथील कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंग राजपुत मृत्यू प्रकरणात उपमुख्यमंत्रीनी दिली प्रतिक्रिया, सीबीआय पुरावे लवकरच उडेजात आणेल ?)

तिरुचिरापल्ली-आधारित बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सेथर लिमिटेड विरुद्ध सीबीआय एफआयआरवर आधारित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. या कंपनीने इंडियन बँक, मदुराई येथील SAM शाखेच्या नेतृत्वाखालील कर्जदारांच्या संघाकडून 895.45 कोटी रुपयांच्या क्रेडिट सुविधा घेतल्या. (वाचा - Devendra Fadnavis on CM Face 2024: मुख्यमंत्री पदाचा चेरहा कोण? देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान; एकनाथ शिंदे गटात खळबळ)

ईडीने सांगितले की, सेथर लिमिटेडचे खाते 31 डिसेंबर 2012 रोजी एनपीए (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट) झाले आणि त्यानंतर 2017 मध्ये चेन्नई येथील नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलसमोर दिवाळखोरी संहिता अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली.