Earthqukes in Maharashtra: आज पहाटे नाशिक, पालघर सौम्य भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरलं

तर नाशिकमध्येही त्याच वेळेस पश्चिम दिशेच्या बाजूने 93 किमी दूर सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

Earthquake. (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र सध्या एकीकडे कोरोना व्हायरससोबत दोन हात करत असताना दुसरीकडे भूकंपासारख्या (Earthquke) नैसर्गिक आपत्तीने अजून महाराष्ट्राच्या काही भागात नागरिक धास्तावले आहे. नाशिक (Nashik)  जिल्ह्याला सलग दोन दिवस तर पालघरला (Palghar) 48 तासांच्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये सलग 5-6 भूकंपाचे धक्के जाणवले असल्याने नागरिकांच्या मनात भीती आहे. दरम्यान पालघर मध्ये आज सकाळी 4 वाजून 17 मिनिटांनी सुमारे 3.2 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. तर नाशिकमध्येही त्याच वेळेस पश्चिम दिशेच्या बाजूने 93 किमी दूर सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

पालघर, तलासरी, डहाणू हे भूकंप प्रवण आहे. मुंबई शहरापासून अवघ्या 100 किमीवर असणार्‍या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवतात. मागील 1-2 दिवसांत जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जीवीतहानी झाल्याचं वृत्त नसले तरीही घराला तडे गेल्याच्या घटना समोर आले आहे.

पालघर मधील मागील 48 तासांतील भूकंपाचे धक्के

नाशिक जिल्ह्या भूकंपाने हादरला

नाशिक मध्येही काल सलग दोनदा आणि आज सकाळी पुन्हा 3.2 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. दरम्यान वारंवार भूकंप जाणवत असल्याने सामान्यांच्या मनात धास्ती आहे. Nashik Earthquake: नाशिकला सकाळपासून दुसरा भूकंपाचा धक्का; 2.5 रिश्टल स्केलने हादरला परिसर.  

दरम्यान मागील काही महिन्यांपासून भारतभर भूकंपाचे धक्के विविध राज्यात जाणवत आहेत. यामध्ये दिल्ली, नोएडा, अहमदाबाद, मिझोराम, बंगलोरचा समावेश आहे. मुंबई मध्ये मागील आठवड्यात भूकंपाच्या धक्क्यांसोबतच मध्यरात्री अचानक मोठ्या मेघगर्जना,  वीजांचा कडकडाट  ऐकायला मिळत होता. दरम्यान सध्या मुंबईमध्ये पावसाने थोडी उसंत घेतली आहे. परंतू  लागोपाठ भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने आता नागरिकांच्या मनात भीती आहे. सुदैवाने मागील आठवडाभर सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकांमध्ये अद्याप एकही जीवितहानी नोंदवण्यात आलेली नाही.