Earthquake In Palghar: पालघर पुन्हा हादरले! आज 3.47 वाजता 2.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप
आज 3.47 वाजता 2.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकपाचा धक्का बसला आहे. यासंदर्भात राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने (National Centre for Seismology) माहिती दिली आहे.
Earthquake In Palghar: पालघर (Palghar) पुन्हा हादरले आहे. आज 3.47 वाजता 2.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकपाचा धक्का बसला आहे. यासंदर्भात राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने (National Centre for Seismology) माहिती दिली आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील महिन्यात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात भूकंपाचे सहा सौम्य धक्के बसले होते. या सर्व भूकंपाचे केंद्रबिंदू डहाणू तालुक्याच्या परिसरात होते. तसेच केंद्रबिंदूची खोली पृष्ठभागापासून दहा किलोमीटर होती. (हेही वाचा - Ganesh Visarjan 2020: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची शहरातील गणेश विसर्जन सोहळ्याला हजेरी; पहा फोटो)
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यापासून या भूकंपाच्या धक्काची तीव्रता कमी झाली आहे. परंतु,भूकंपाच्या धक्काने येथील घरांना तडे गेले आहेत.