Earthquake In Palghar: पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के
सकाळपासून या भागात 6 भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी 11.39 वाजताच्या दरम्यान धुंदलवाडी, आंबोली, ओसारविरा, कासा भागात भूकंपाचा धक्का जाणवला.
Earthquake In Palghar: पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सकाळपासून या भागात 6 भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी 11.39 वाजताच्या दरम्यान धुंदलवाडी, आंबोली, ओसारविरा, कासा भागात भूकंपाचा धक्का जाणवला.
दरम्यान, आज सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी 1.8 तीव्रतेचा, 11 वाजून 39 मिनिटांनी 3.1 तीव्रतेचा, दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी 2.1 तीव्रतेचा, सायंकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी 1.8 तीव्रतेचा, सायंकाळी 5 वाजून 8 मिनिटांनी 2.3 तर सायंकाळी 5 पाच वाजून 23 मिनिटांनी 3.2 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. यासंदर्भात लोकसत्ताने आपल्या वेबसाईटवर वृत्त प्रकाशित केलं आहे. (हेही वाचा - पक्षाच्या झेंड्याने पोलिसांना मारहाण; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा शहर चिटणीस मनोज कोकणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल)
डहाणू, तलासरी भागात यापूर्वी अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज झालेल्या भूकंपाचे केंद्रबिंदू डहाणू तालुक्याच्या परिसरात होते. या भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली पृष्ठभागापासून 10 किलोमीटर होती. भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आज जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पालघर जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांपासून भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सातत्याने सुरू आहे. एप्रिल महिन्यात डहाणू, तलासरी तालुक्यातील बहुतांश भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. सध्या पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत येथील परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.