दसर्‍याच्या दिवशी मुंबईत सोन्याचा भाव किती ?

दसर्‍याच्या दिवशी तुम्हीही सोनं खरेदीचा विचार करत असलात तर सोन्याचा आजचा भाव पाहून खरेदीला बाहेर पडा.

सोन्याचा भाव Photo Credits Pixabay

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण आहे. दसर्‍याच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. अनेकजण किमान एखादी लहान वस्तू दिवाळीच्या दिवशी अवश्य विकत घेतात. मागील काही दिवसांपासून डॉलरसमोर रूपयावर वाढणारा दबाव, कोसळणारं शेअर मार्केट यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणं अनेकांनी पसंत केलं आहे. आज दसर्‍याच्या दिवशी तुम्हीही सोनं खरेदीचा विचार करत असलात तर सोन्याचा आजचा भाव पाहून खरेदीला बाहेर पडा.

दसर्‍याच्या दिवशी सोन्याचा भाव

22 कॅरेट सोने - 31,300 प्रति तोळे

24 कॅरेट सोनं - 33,160 प्रति तोळे

हा सोन्याचा दर बाजारभावातील आहे. सोन्याचा दागिना खरेदी करताना ग्राहकांना काही प्रमाणात अधिक रक्कम आकारली जाते. मात्र कालच्या तुलनेत आज सोने स्वस्त आहे. तर मुंबईत चांदीचा भाव प्रतिकिलो 41,200 रूपये आहे.

दसर्‍यापासून देशभरात सणांची रेलचेल सुरू होते. लग्नसराईचाही काळ सुरू होणार असल्याने ग्राहकांची सोने खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. दिवाळीपर्यंत सोनं अजून थोडं महागण्याची शक्यता आहे. ...म्हणून साजरा केला जातो दसरा