नाल्यात कचरा टाकल्यास वस्तीचे पाणी बंद करा, प्रवीण परदेशी यांचा कर्मचाऱ्यांना आदेश
मुंबईतील नाल्यांची सफाई पूर्ण होताच पुन्हा काही महाभागांनी कचरा टाकल्याने नाले तुंबलेल्या अवस्थेत पाहायला मिळत होते यावर निर्बंध लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी एक अनोखा तोडगा काढला आहे. यापुढे नाल्यात कचरा टाकल्यास परिसरातील वस्तीचे पाण्याचे कनेक्शन बंद करण्याची कल्पना पालिकेच्या मिटींगमध्ये मांडण्यात आली.
मुंबई: पावसाळा सुरु व्हायला आता काहीच दिवसांचा अवकाश असल्याने मुंबई विभागात नाले सफाईच्या कामांनी चांगलाच जोर धरला आहे. मात्र काही महाभाग हे स्वच्छ केलेल्या नाल्यात पुन्हा नव्याने कचरा टाकून महापालिकेचं काम विनाकारण वाढवताना पाहायला मिळतात. या मंडळींवर आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे (BMC) नवनिर्वाचित आयुक्त प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) यांनी नवा नियम तयार केला आहे. ज्या वस्तींच्या लगतच्या नाल्यात वस्तीतील रहिवाशी कचरा टाकताना आढळतील त्या वस्तीच्या पाण्याचे कनेक्शन कापून टाकण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. मान्सून पूर्व तयारीच्या योजना आखण्यासाठी मंगळवारी आयोजित केलेल्या मीटिंग मध्ये परदेशी यांनी ही घोषणा केली.
बीएमसीने साफ केलेल्या नाल्यात कचरा टाकणाऱ्यांना सुरवातीला विनंती करून त्यानंतर दंड आकारून ताकीद देण्यात येईल पण त्यानंतरही न ऐकल्यास त्यांच्या परिसरात पाण्याचे कनेक्शन बंद करण्यात येईल असे परदेशी यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या या मीटिंग मध्ये कर्मचाऱ्यांनी आजवर स्वच्छ केलेल्या नाल्यांचा अहवाल सादर केला मात्र सफाई केल्याच्या काहीच दिवसात हे नाले पुन्हा तुंबलेले आढळून आल्याचे देखील समोर आले. यात झोपडपट्टी लगतचे नाले तुंबल्याचे प्रामुख्याने दिसून आले होते. यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करायची गरज आहे असे म्हणत परदेशी यांनी सर्व वार्ड अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. Western Railways: 'पश्चिम रेल्वे' ची मान्सूनपूर्व तयारी, ड्रोन मार्फत सर्वेक्षण आणि नालेसफाईला सुरवात
या अंतर्गत नाल्यांच्या काठावर फ्लोटिंग ब्रुम व जाळ्या बसवण्यात याव्यात व कचरा टाकणार्यांवर लक्ष ठेवण्याची तरतूद करावी असे सुचवण्यात आले आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालिकेने तयार केलेल्या एका मोबाईल ऍप वर नालेसफाई व रस्तेदुरुस्ती कामांचे फोटो उपलोड करण्यास सांगितले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)