मुंबई: नववर्षाच्या स्वागतासाठी वांद्रे येथील महत्त्वाच्या मार्गांवर करण्यात आली विशेष वाहतूक व्यवस्था; पार्किंगसाठी खास उपाययोजना
वांद्र्याच्या माउंटमेरी चर्च, बेहरामजी जीजीभाई रोड (B.J.Road), केन रोड यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगसाठी खास उपाययोजना करण्यात आली आहे.
नवीन वर्षाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असताना आजच्या थर्टी फर्स्ट साठी सर्वांचे विशेष प्लान्स बनले असतील. 31st निमित्त काही लोक घरीच राहणे पसंत करतात तर काहींना बाहेर फिरायला जाणे आवडते. मुंबईत अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे थर्टी फर्स्टच्या रात्री प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे हे गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुंबईत वर्दळीच्या समजल्या जाणा-या वांद्रा परिसरात मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून विशेष वाहतूक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लोकांना कोणत्याही ट्रॅफिक समस्येला सामोरे जाऊ लागू नये म्हणून ही विशेष सेवा करण्यात आली आहे.
वांद्र्याच्या माउंटमेरी चर्च, बेहरामजी जीजीभाई रोड (B.J.Road), केन रोड यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगसाठी खास उपाययोजना करण्यात आली आहे.
पाहा कशी असेल वाहतूक व्यवस्था:
पुढील 11 ठिकाणी प्रवाशांना गाडीतून उतरण्यासाठी किंवा चढण्यासाठी वाहनांना थांबण्यास सक्त मनाई घातली आहे. नववर्षाच्या निमित्ताने गडकिल्ल्यांवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून तळीरामांवर ग्रामस्थांनीच आणली 'बंदी'; कोणती आहेत ही ठिकाणे
1. माउंटमेरी रोड
2. परेरा रोड
3. केन रोड
4. हिल रोड
5. माऊंट कारमेल रोड
6. चॅपल रोड
7. जॉन बॅप्टिस्ट रोड
8. सेंड सेबेस्टियन रोड
9. रिबेलो रोड
10. सेंट पॉल रोडक्ट
11. डॉ. पिटर डायस रोड
तसेच नववर्षाच्या ख्रिस्ती बांधवांसह अनेक लोक माउंटमेरी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येतात. अशा वेळी येथे येणा-या भाविकांनी आपली वाहने बेहरामजी जिजीभाई मार्ग, बँड स्टँड येथील समुद्राकडील भागात, सुपारी तलाव मैदानात पार्क करावेत.