Dry Days For Mahaparinirvan Diwas 2022 in Mumbai: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई मध्ये पहा कुठे आहे 5, 6 डिसेंबर दिवशी ड्राय डे?
30 नोव्हेंबरच्या नोटीसी मध्ये बाबासाहेबांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'ड्राय डे' जाहीर झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं (Mahaparinirvan Diwas) औचित्य साधत 5 आणि 6 डिसेंबर दिवशी मुंबई मध्ये दादर आणि आजूबाजूच्या भागात ड्राय डे (Dry Day) पाळला जाणार आहे. त्यामुळे या दोन दिवशी दादर भागातील मद्यविक्रीची दुकानं आणि बार बंद ठेवले जाणार आहेत. रिपोर्ट्सनुसार याबाबतीची नोटीस मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतेकर (Mumbai Collector Rajeev Nivatkar) यांनी जारी केली आहे. त्यामध्ये जिल्हाधिकार्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मद्य व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. 30 नोव्हेंबरच्या नोटीसी मध्ये बाबासाहेबांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'ड्राय डे' जाहीर झाला आहे. या दिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात लोकं चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करायला येतात.
“मी विनंती करतो की चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील सर्व दारूची दुकाने आणि बिअर बार 05 डिसेंबर ते 06 डिसेंबर पर्यंत बंद ठेवावेत,” असे मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे अता महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोमवार, 5 डिसेंबर ते मंगळवार, 6 डिसेंबरपर्यंत दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत. नक्की वाचा: Mahaparinirvan Diwas 2022 Mumbai Local Train, BEST Update: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबईत बस, रेल्वे कडून विशेष सोय; पहा खास सोयी-सुविधा.
मद्य विक्रीची दुकानं कुठे राहतील बंद?
परिपत्रकानुसार दादर, शिवाजी पार्क, माहीम, धारावी आणि सायनमध्ये दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत. याशिवाय करी रोड स्टेशन, वरळी सी फेस, वरळी कोळीवाडा ते संगम नगरपर्यंतचा सर्व भागही ‘ड्राय डे’ म्हणून पाळला जाणार आहे. दुसरीकडे सायन कोळीवाडा, किंग्ज सर्कल, वडाळा, शिवडी, काळाचौकी आणि भोईवाडा या भागातही 6 डिसेंबरला दारूची दुकाने आणि बार बंद राहतील.
महाराष्ट्र वाईन मर्चंट्स असोसिएशनचे (MWMA) अध्यक्ष Dilip Giyanani यांनी ‘ Mid-day’शी बोलताना सांगितले की, "आम्हाला अद्याप कोणताही आदेश मिळालेला नाही. परंतु, या दिवसाशी धार्मिक भावना जोडल्या गेल्यामुळे दरवर्षी हा आदेश जारी केला जातो. आम्ही त्याचा आदर करतो. आम्हाला एक किंवा दोन दिवस आधी ऑर्डर मिळाली असली तरी आम्हाला ती स्वीकारावी लागेल."