Dry Day in Mumbai on June 4: लोकसभा निकालाच्या दिवशी 'ड्राय डे' ला विरोध; हॉटेल असोसिएशनची न्यायालयात धाव

मुंबई शहर आणि उपनगरात 4 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी 'ड्राय डे' घोषित केला होता. त्याला विरोध म्हणून हॉटेल असोसिएशनची न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

liquor | Representative Image | (Photo Credits: Pixabay)

Dry Day in Mumbai on June 4: इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (एएचएआर) ने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court)धाव घेतली आहे. दाखल केलेल्या याचिकेनुसार, 'मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता असतानाही, 4 जून रोजी मतदानाचा दिवस हा ड्राय डे(Dry Day) म्हणून घोषित करण्यात आला आहे. दुपारपर्यंत लोकसभा निवडणुकीचे ( Lok Sabha Result Day)निकाल जाहीर होतील. त्यामुळे संपूर्ण दिवस मद्यविक्रीस बंदी घालण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मनमानी आहे', असे ‘आहार’ने याचिकेत म्हटले आहे. बुधवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा:Dry Day In Maharashtra: राज्यात तीन दिवस ड्राय डे; दारूची दुकाने राहणार बंद, नेमकं कारण काय? )

‘ड्राय डे’च्या दिवशी हॉटेल, रेस्टॉरंट्स, वाईन शॉपमध्ये दारू विक्री करण्यास मनाई करण्यात येते. त्यामुळे' या निर्णयावर फेरविचार करण्यात यावा, यासाठी मुंबई जिल्हाधिकारी व उपनगर जिल्हाधिकाऱ्यांपुढे निवेदन सादर केले. मात्र, हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार घेण्यात आल्याने मागे घेणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले,' असे याचिकेत म्हटले आहे.

आहारची पोस्ट पहा: