Dry Day in Maharashtra: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज मद्यविक्री दुकानांना टाळे; बार आणि पब मध्येही दारूला बंदी

यामुळे शिवजयंतीच्या निमित्ताने आज 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे (Dry Day in Maharashtra) घोषीत करण्यात आला आहे.

Alcohol (Photo Credit: IANS)

महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj Jayanti 2020) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात शिवजयंती साजरी केली जाते. यामुळे शिवजयंतीच्या निमित्ताने आज 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे (Dry Day in Maharashtra) घोषीत करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व मद्यविक्रीचे दुकाने आज बंद ठेवण्यात आली आहेत. एवढेच नव्हेतर, बार आणि पबमध्येही दारूला बंदी घालण्यात आली आहे. शिवजयंती निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्यात येते. दरम्यान, अनेकजण दारू पिऊन धिंगाणा घालतात. तसेच गोंधळ घालतात. यामुळे शिवजयंतीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे घोषीत करण्यात यावा, अशी मागणी अनेक शिवप्रेमी संघटनाच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी जाहीर केली जाते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी दिलेले योगदान अनेकांच्या लक्षात यावे, यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि गनिमी युक्तीने बलाढ्य माराठा सम्राज्य निर्माण केले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरिपेक्ष राजा होते. त्यांचा जात-पातला विरोध असून त्यांच्या सैन्यात अनेक जाती, धर्माचे लोक कार्यरत होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील विविध ठिकाणी त्यांचे पुतळेही स्थापित करण्यात आले आहेत. दरवर्षी नियमितपणे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यातच यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे घोषीत करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Shiv Jayanti 2020 निमित्त कोल्हापूर येथे काढण्यात आलेल्या मिरवणूकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; पहा Video

दरम्यान, शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम आज शिवनेरी गडावर पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवनेरीवर पाळणा जोजवतील त्यानंतर गडावर इतर कार्यक्रमांना सुरुवात होईल. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शिवनेरीवर उपस्थित असणार आहेत. मुंबईत शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे देखील उपस्थित होते. यावेळी संपूर्ण शिवाजी पार्क हे 'जय भवानी, जय शिवाजी' या घोषणांनी दुमदुमून गेले होते.