Drugs Case: ड्रग्ज संबंधित आरोपांवरुन भाजप नेते मोहित कंबोज आक्रमक, नवाब मलिक यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा खटला दाखल
मात्र महाराष्ट्र सरकार मधील मंत्री नवाब मलिक या प्रकरणामुळे अद्याप चर्चेत आहेत.
Drugs Case: मुंबईत ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अखेर जामीन मिळाला आहे. मात्र महाराष्ट्र सरकार मधील मंत्री नवाब मलिक या प्रकरणामुळे अद्याप चर्चेत आहेत. अशातच भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानिचा खटला दाखल केला आहे.(Aryan Khan Update: आर्यन खानसोबत तुरूंगात राहिलेल्या सोबतीने बाहेर येताच सुरू केली बढाई, पुन्हा घेतलं पोलिसांनी ताब्यात)
गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक सातत्याने भाजप नेते मोहित कंबोज आणि त्यांच्या परिवारावर गंभीर आरोप लावत होते. मुंबईत ड्रग्ज प्रकरणी सुद्धा वारंवार त्यांच्या परिवाराचे संबंध असल्याचे म्हटले जात होते. याच कारणामुळे 9 ऑक्टोंबरला मोहित यांनी मलिक यांच्या नावे एक नोटिस धाडली होती. त्यामध्ये असे म्हटले की, कोणत्याही पूराव्याशिवाय मानहानिकारक विधान करणे चुकीचे आहे. मात्र नवाब मलिक यांनी त्या नोटिस व्यतिरिक्त ही विधान करणे सुरुच ठेवले होते आणि पुन्हा 11 ऑक्टोंबरला त्यांच्या परिवारावर निशाणा साधला.
अशातच आता भाजप नेते नवाब मलिक यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी कंबोज हे पुढे आले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली आहे. उच्च न्यायालयात मध्ये नवाब मलिक यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. बॉम्बे हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मोहित यांनी स्वत: सांगितले की, ते भाजपचे सदस्य असून त्यांचा एक उद्योग आहे. मात्र नवाब मलिक यांच्या कोणत्याही तथ्याशिवाय करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा धुळीला मिळवण्याचे काम करत आहेत.(Thieves In Mannat: आर्यन खानला पहायला जाणे चाहत्यांना पडले महागात, मन्नतबाहेर चोरांनी लांबवले 10 मोबाईल)
दरम्यान, जेव्हा एनसीबीकडून क्रुजवर छापा टाकण्यात आला तेव्हा काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. तेव्हा नवाब मलिक यांनी 8 ऐवजी 11 लोकांना अटक केल्याचे म्हटले होते. परंतु नंतर भाजप नेत्याचा फोन आला आणि तीन लोकांना सोडून दिले गेले. मलिक यांनी असा सुद्धा दावा केला की, सोडून देण्यात आलेल्या मोहित याच्या बायकोचा भाऊ सुद्धा होता. याच कारणामुळे भाजप नेते नवाब मलिक यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. या मानहानि प्रकरणी नवाब मलिक यांनी आपली कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.