महाराष्ट्रातील दुष्काळ: दुष्काळी तालुक्यांच्या यादीत तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का? इथे पाहा
म्हणूनच जाणून घ्या दुष्काळी तालुक्यांच्या (जिल्हे) यादीत तुमच्या तालुक्याचे नाव आहे काय?
राज्य सरकारने या वेळी सरसकट दुष्काळ जाहीर केला नाही. तर, राज्यातील काही जिल्हे आणि तालुक्यांमध्येच तो जाहीर केला आहे. त्यातही दुष्काळाची तीव्रता पाहून गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असा त्यात भेदही केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात नव्हे तर, राज्यातील काहीच भागात दुष्काळ असल्याचे चित्र उभे राहिले आहे. दरम्यान, राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी केवळ २६ जिल्ह्यांमध्ये तर, एकूण ११२ तालुक्यांमध्ये गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ सरकारने जाहीर केला आहे. म्हणूनच जाणून घ्या दुष्काळी तालुक्यांच्या (जिल्हे) यादीत तुमच्या तालुक्याचे नाव आहे काय? महत्त्वाचे असे की, ही यादी तालुक्यात असलेल्या गंभीर आणि मध्यम पद्धतीच्या दुष्काळानुसार तयार करण्यात आली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांची नावे गंभीर आणि मध्यम अशा दोन्ही पद्धतीच्या दुष्काळ यादीत आली आहेत.
गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असलेले तालुके (जिल्ह्यांच्या नावासह)
(*यादी राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार)
(हेही वाचा, महाराष्ट्रातील दुष्काळ: दुष्काळी जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का? इथे पाहा)
सांगली - सांगली जिल्ह्यातील एकूण पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात, आटपाडी, जत, कवठेमंहांकाळ, खानापूर, तासगाव या तालुक्यांचा समावेश आहे.
सातारा - सातारा जिल्ह्यात केवळ मान-दहिवडी या एकाच तालुक्याचा गंभीर स्वरुपाच्या दुष्काळी तालुक्यात समावेश आहे.
सोलापूर - एकूण ९ तालुक्यांचा समावेश. त्यांची नावे करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर
पालघर - या जिल्ह्यातील पालघर, तलासरी, विक्रमगड अशा एकूण तिन तालुक्यांचा समावेश आहे.
धुळे - धुळे, सिंदखेडे असा दोनच तालुक्यांचा गंभीर दुष्काळी यादीत समावेश आहे.
जळगाव - अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल आदी.
नंदुरबार - जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, शाहदा या तीन तालुक्यांचा समावेश आहे.
नाशिक - नाशिक जिल्ह्यातही बागलान, मालेगांव, नांदगांव आणि सिन्नर तालुक्याचा समावेश आहे.
अहमदनगर - कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड आदी तालुक्यांचा समावेश आहे.
औरंगाबाद - औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नकड
बीड - या जिल्ह्यात आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर(कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा तालुक्यांचा समावेश आहे.
जालना -जालना जिल्ह्यात ँबंड, बदनापूर, भोगरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना परतूर तालुक्यांचा समावेश आहे.
नांदेड - मुखेड, देगलूर
उस्मानाबाद - लोहारा, कळंब, उस्मानाबाद, पारांडा, भूम, तुळजापूर, वासी, भूम
परभणी - मनवथ, पाथरी, सोनपेठ पालम, परभणी, सेलू
हिंगोली - हिंगोली सेनगाव
अमरावती- या जिल्हात केवळ मोर्शी हा एकच तालुका गंभीर दुष्काळी आहे.
बुलडाणा - या जिल्ह्यात खामगाव, लोणार, नंदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा हे तालुके गंभीर दुष्काळी आहेत.
यवतमाळ - बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव
चंद्रपूर - चिमूर
नागपूर - राज्याची उपराजधानी असलेल्या या जिल्ह्यात काटोल आणि कळमेश्वर हे तालुके गंभीर दुष्काळी आहेत.
मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असलेले तालुके (जिल्हानिहाय)
पुणे - पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या पुण्यात एकूण ७ तालुके दुष्काळी आहेत. यात आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हा, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घडनंदी तालुक्यांचा समावेश आहे.
सातारा - कोरेगाव, फलटण या दोन तालुक्यात मध्यम दुष्काळ आहे.
धुळे - शिरपूर
नंदुरबार - तळोदे
नाशिक - देवळा इगतपूरी, नाशिक, चांदवड
नांदेड - उमरी
हिंगोली - कळमनुरी
लातूर - शिरुप अनंतपाळ
अकोला - बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेलहरा, अकोला
अमरावती अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगाव सुर्जी
बुलढाणा - मोताळा
वाशिम - रिसोड
यवतमाळ -कलापूर, मोरेगाव, यवतमाळ
चंद्रपू - ब्रम्हपूरी, नागिभिर, राजुरा, सिंदेवाही
नागपूर - नगरखेड
वर्धा -आष्टी