शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांनी 'दर्शनाला येताना सभ्य पोषाखात यावे,' अशा आशयाचा लावला फलक
हा फलक येणा-या भाविकांच्या पोशाखाबद्दल आहे.
लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात देशभरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र हळूहळू अनलॉकच्या टप्प्यात ही मंदिरे हळूहळू सुरु झाली आहेत. भाविक सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत देवाच्या दर्शनासाठी येत आहे. मंदिरात भाविकांना सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी राज्य सरकारने विशेष नियमावली बनविण्यात आली आहे. या मार्गदर्शनक सूचनांचे पालन करुनच ही मंदिरे पुन्हा सुरु झाली आहे. या मंदिरापैकी शिर्डीच्या प्रसिद्ध साईबाबा मंदिरात (Shirdi Sai Baba Mandir) भाविकांसाठी विशेष फलक लावण्यात आला आहे. हा फलक येणा-या भाविकांच्या पोशाखाबद्दल (Dress Code) आहे.
लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीच्या साईबाबा मंदिरात 'दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सभ्य पोशाषात यावे' अशा आशयाचे हे फलक आहे. साई शिर्डी संस्थानाकडून हे फलक लावण्यात आले आहे. हा फलक मंदिराच्या बाहेर लावण्यात आला आहे.हेदेखील वाचा- Churches in Mumbai to Reopen: मुंबईतील सर्व चर्च उद्यापासून होणार खुली; कोविड-19 नियमांचे पालन करणे अनिवार्य
शिर्डी साईबाबा मंदिरात कोरोना महामारीच्या दरम्यान विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने दर्शनासाठी पास घ्यावा लागणार आहे. ठरवून देण्यात आलेली वेळ आणि तारखेनुसार भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे. 3000 भाविकांना ऑनलाईन पेड पास दिला जाणार आहे. इतर वेळी आरतीसाठी 250 ते 300 भाविक उपस्थित असत. मात्र यावेळी आरतीसाठी 50 जणांनाच सहभागी होता जाणार आहे. आरतीसाठी पास आरक्षित असणार आहे.
त्याचबरोबर मोबाईल आणि इतर वस्तूस मंदिरात नेण्यास मनाई आहेत. कोरोनापूर्वी असलेल्या नियम कायम राहणार असून कोरोनासाठी काही खास नियम घालण्यात आले आहेत. दरम्यान मुंबईतील (Mumbai) सर्व चर्च रविवार (29 नोव्हेंबर) पासून खुली झाली आहेत. त्यासोबतच मासेस (Masses) आणि सोहळ्यांसाठी देखील परवानगी देण्यात आली आहे. यासाठी कोविड-19 नियमांचे (Covid-19 Protocols) पालन करणे अनिवार्य आहे. राज्य सरकारने 16 नोव्हेंबर पासून सर्व धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी दिली होती.