Dr. Payal Tadvi Suicide Case: पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कुटुंबाला सरकार कडून 10 लाखाची मदत जाहीर

पायल तडवी हिच्या आत्महत्या प्रकरणी आता तडवी कुटुंबियांना सरकारकडून दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पायलच्या आत्महत्येचा सध्या तपास सुरु असून यात गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Payal Tadvi (Photo Credits: Facebook)

नायर हॉस्पिटल (Nair Hospital)  मधील शिकाऊ डॉक्टर पायल तडवी (Payal Tadvi) हिच्या आत्महत्येनंतर जातीयवादाच्या मुद्द्याने आणखीनच जोर धरला आहे. अनुसूचित जातीच्या पायलचा मानसिक छळ करत तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या आरोपावरून काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील तीन डॉक्टरांना कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान सामाजिक संघटनांच्या मागण्या मान्य करत तडवी कुटुंबाला सरकार कडून दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन संचानलनालयाने तयार केलेल्या समितीचा तपास सुरु असून सोमवारी या प्रकरणी तडवी कुटुंबीयांची चौकशी पार पडली होती.

जळगावच्या छोट्या गावातून संघर्षमय परिस्थितीला तोंड देत डॉक्टर झालेल्या  पायलच्या आत्महत्यामुळे कुटुंबाचे व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत, कायदेशीर सहाय्य मिळायला हवे, अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांकडून करण्यात येत होती. ही मागणी लक्षात घेऊन सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या सूत्रांना सांगितले आहे. यासोबतच या प्रकरणाचा अभ्यास करणाऱ्या समितीमध्ये आदिवासी व अनुसूचित जातींच्या प्रश्नच भान असणाऱ्या अभ्यासकांना नेमण्यात यावे असे देखील संघटनांचे म्हणणे आहे.पायलच्या आत्महत्यामुळे रॅगिंग किंवा जातीय छळाच्या तक्ररींना गांभीर्याने घेत यावर समाधान आणण्यासाठी योग्य ती यंत्रणा तयार करण्याची मागणी देखील लावून धरली जातेय.

तडवी कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी नायर हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन करत या प्रकरणाचा कायदेशीर तपास व्हावा अशी मागणी केली होती.सोमवारी पार पडलेल्या चौकशीत पायलने याआधी कुटुंबाकडे तिला होणाऱ्या त्रासाची वाच्यता केली होती का? त्यावर कुटुंबांने काय भूमिका घेतली होती? या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती का? याबाबत कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून पाहिल्यास काही पुरावे हाती लागू शकतात असे देखील तडवी कुटुंबाने सांगितले आहे.Dr. Payal Tadvi Suicide Case: नायर हॉस्पिटलची मान्यता रद्द करा - तडवी कुटुंबीयांची मागणी

या प्रकरणी रीतसर तपास करून तडवी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पोलिसांच्या तपासात पायलची आत्महत्या ही रॅगिंगमुळेच झाल्याचे सिद्ध झाल्यास आरोपींचा वैद्यकीय परवाना कायमचा रद्द करण्यात येणार आहे.



संबंधित बातम्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

Adani Power Plant Contract: मुंबई उच्च न्यायालयाने अदानी पावर विरोधात दाखल याचिका फेटाळली; याचिकाकर्त्यांला ठोठावला 50 हजारांचा दंड

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील