Tips for Farmers: शेतात असताना मेघगर्जना होत असल्यास काय करावे वा करु नये, RMC ने ट्विटद्वारे दिली माहिती
शेतात असताना मेघगर्जना (Tips for Farmers) होत असल्यास काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी खास प्रादेशिक हवामान व विज्ञान केंद्राने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
राज्यात उकाडा वाढत असला तरी हवामानात कधीही बदल होतो ज्यामुळे कधी मेघगर्जनेसह धो-धो पाऊस देखील पडतो. अशावेळी शेतात करणा-या शेतक-यांना कधी कधी काय करावे ते सुचत नाही. अशावेळी कोणती खबरदारी घ्यावी हेच ब-याचदा अनेकांच्या लक्षात येत नाही. शेतात असताना मेघगर्जना (Tips for Farmers) होत असल्यास काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी खास प्रादेशिक हवामान व विज्ञान केंद्राने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
शेतात असताना वीज चमकल्यास काय करावे?
- फळबागा आणि भाजीपाल्यामध्ये आधार व यांत्रिक साहाय्य द्यावे.
- प्राण्यांना खुले पाणी, तलाव आणि नदीपासून दूर ठेवावे
- शेतातील उभ्या पिकांमधील नको असलेले पाणी काढून टाका
- जर शेतकरी शेतात असतील तर आणि त्यांना निवारा मिळाला नसेल तर उंच वस्तू टाळा. जवळपास तुरळक झाडं असल्यास त्याखाली जाऊन बसावे.
शेतात असताना वीज चमकल्यास काय करु नये?
- विद्युत उपकरणे, वायर वा केबलचा वापर टाळा
- ट्रॅकर, शेतीची उपकरणे, दुचाकीपासून दूर राहा.
- आपल्या प्राण्यांना झाडाखाली जमू देऊ नका. त्यांच्यावर लक्ष ठेवा.
हवामानाचा ऊन-पावसाचा खेळ हा सुरुच असतो. मात्र आपण योग्य ती खबरदारी घेतल्यास कोणतीही अडचण येणार नाही हे लक्षात ठेवा. शेतक-यांनी वीज चमकत असताना स्वत:ची तसेच आपल्या प्राण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. साधारणपणे जूनच्या पहिल्या वा शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. त्यानंतर हळूहळू राज्यात धो-धो पाऊस पडायला सुरुवात होईल. अशा वेळी शेतक-यांनी शेतात काम करताना वर दिलेल्या गोष्टी ध्यानात ठेवल्यास त्यांना सहसा अडचण येणार नाही.