Dominos Pizza खाणाऱ्यांनो सावधान! मुंबईतील ग्राहकाला पिझ्झामध्ये सापडले काचेचे तुकडे; कंपनीकडून चौकशी आदेश
या संपूर्ण प्रकरणावर मुंबई पोलिसांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "कृपया प्रथम तुमची तक्रार कस्टमर केअरला करा. त्यांनी प्रतिसाद न दिल्यास कायदेशीर कारवाईचा विचार करू शकता."
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एका व्यक्तीने डॉमिनोजच्या पिझ्झामध्ये (Dominos Pizza) काचेचे तुकडे (Shards of Glass) सापडल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीने काचेच्या तुकड्यांनी भरलेल्या पिझ्झाचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केलं आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, मी ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये दोन ते तीन काचेचे तुकडे सापडले आहेत. यासोबतच त्यांनी या ट्विटद्वारे मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर मुंबई पोलिसांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "कृपया प्रथम तुमची तक्रार कस्टमर केअरला करा. त्यांनी प्रतिसाद न दिल्यास कायदेशीर कारवाईचा विचार करू शकता." (हेही वाचा - Rainbow Snake: रेनबो सापाशी खेळणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय वाऱ्याच्या वेगाने व्हायरल; पहा रंगीबेरंगी साप)
मात्र, यावर डॉमिनोजकडूनही प्रतिक्रिया आली आहे. तक्रारीची दखल घेत, डोमिनोजच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या दर्जेदार टीमने पिझ्झा आउटलेट तपासले. पण आम्हाला यात कोणतेही दोष आढळले नाहीत. या प्रकरणातील तथ्य जाणून घेण्यासाठी कंपनीने पीडित ग्राहकाशी संपर्क साधला, असेही त्यांनी सांगितले. डोमिनोजच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही स्वयंपाकघरात नो-ग्लास नीतीचा अवलंब करून गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करतो. वापरकर्त्याकडून नमुने घेतल्यानंतर आम्ही या प्रकरणाची पुढील चौकशी करू आणि त्यानुसार कारवाई करू, असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरं तर, मुंबईतील एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर डॉमिनोज पिझ्झामध्ये कथितरित्या सापडलेल्या काचेच्या तुकड्यांची छायाचित्रे पोस्ट केल्यानंतर, रविवारी कंपनीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. ग्राहक अरुण कोल्लुरी यांनी पिझ्झा आउटलेटद्वारे विकल्या जाणार्या खाद्यपदार्थाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याने सांगितले की, त्याने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये काचेचे तुकडे सापडले. तथापि, यात डॉमिनोजच्या आउटलेटचा आणि वितरणाच्या तारखेचा उल्लेख नव्हता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)