Dombivli Gang Rape Case: डोंबिवली येथे 15 वर्षांच्या मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार, 22 जण पोलिसांच्या ताब्यात; आरोपींमध्ये राजकीय नेत्यांच्या मुलांची नावे

डोंबिवली ९Dombivli Gang Rape Case) पूर्वेस असलेल्या मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी 29 पैसी 22 आरोपींना ताब्यत घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

डोंबिवली (Dombivli) येथील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटा उघडकीस आली आहे. डोंबिवली (Dombivli Gang Rape Case) पूर्वेस असलेल्या मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी 29 पैसी 22 आरोपींना ताब्यत घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पीडित मुलगी ही केवळ 15  वर्षांची आहे. प्राप्त माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. आरोपींनी पीडितेवर बदलापूर,रबाळे ,मुरबाड आणि डोंबिवलीत ,वेगवेगल्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे डोंबिवलीच नव्हे तर महाराष्ट्र हादरुन गेला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात एकूण29 पैकी ताब्यात घेतलेल्या 22 आरोपींमध्ये काही स्थानिक राजकीय नेत्यांच्या मुलांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, ही मुले नेमकी कोण आहेत. त्यांचा राजकीय नेत्यांशी किती संबंध आहे याबाबत तपशील उपलब्ध झाला नाही. घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, पीडित मुलचे एका युवकाशी प्रेमसंबंध होते. त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवतानाचा एक व्हिडिओ काढला. या व्हिडिओच्या आधारे पीडितेला ब्लॅकमेल करत या 29 जनांनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून आरोपींची नावे अद्याप निष्पन्न झाली नाहीत. (हेही वाचा, Uttar Pradesh: लग्नाहून परतणाऱ्या तरुणीवर चाकूचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार)

ट्विट

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडितेवर पाठिमागील 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरु होते. अखेर पीडितेने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर प्रकरणाचा भांडाफोड झाला. पोलिसांनी तरुणीला विश्वासात घेऊन चौकशी सुरु केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आलेली माहिती पाहून पोलिसांनाही जोरदार धक्का बसला. आरोपींनी पीडितेवर बदलापूर,रबाळे ,मुरबाड आणि डोंबिवलीत ,वेगवेगल्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी आतापर्यंत 22 आरोपींना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.