Dombivali Shocker: कुत्र्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीला अटक

पिपल फॉर अ‍ॅनिमल्स (PFA) या ग्रुपच्या काही सदस्यांनी कुत्र्याचा छळ केल्याची तक्रार विष्णू नगर पोलिस स्टेशनमध्ये केली त्यानुसार एका 32 वर्षीय व्यक्तीला अटक झाली आहे.

Representational Image Dog (Photo Credits: Pixabay)

डोंबिवली पोलिसांनी 32 वर्षीय व्यक्तीला एका कुत्र्याचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. Ramsamojh Chauhan असं या व्यक्तीचं नाव असून त्याला अनैसर्गिक सेक्स आणि अ‍ॅनिमल क्रुएलिटी या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं आहे. पिपल फॉर अ‍ॅनिमल्स (PFA) या ग्रुपच्या काही सदस्यांनी कुत्र्याचा छळ केल्याची तक्रार विष्णू नगर पोलिस स्टेशनमध्ये केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्स नुसार, PFA च्या सदस्यांनी आरोपी व्यक्तीचा 13 डिसेंबर दिवशी डोंबिवली खाडीवर कुत्र्याचा छळ करत असल्याचा एक व्हिडिओ देखील पोलिस स्टेशनमध्ये सादर केला आहे. पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ही तक्रार अ‍ॅनिमल क्रुएलिटी आणि अननॅचरल सेक्स यासाठी दाखल करून घेतली आहे. तर उल्वेमध्येही काही दिवसांपूर्वी 40 वर्षीय एका वॉचमॅनला कुत्रीला मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. कुत्र्याच्या पिल्लावर बलात्कार; CCTV फुटेज मिळूनही पोलिसांची साक्षीदार महिलेकडे घटनेबाबत सविस्तर माहितीची मागणी.

Sunny Arcade या इमारतीचा वॉचमन एम रमेश याला सेक्शन 429 अंतर्गत पोलिसांच्या ताब्यात आहे. Sunny Arcade कॉम्प्लेक्स मध्ये कुत्री आल्याने त्याने तिला काठीने मारलं. त्यानंतर जखमी अवस्थेतील कुत्रीला Bhumi Jeevdaya NGO च्या तुर्भे शाखेमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी प्राणीप्रेमीकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे.