डोंबिवली: एमआयडीसी मध्ये रस्ते झाले गुलाबी, डोळे चुरचुरत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी

तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मुंबईत प्रदुषणामुळे हवेचा दर्जा खालावला जात असल्याची बाब समोर आली होती.

डोंबिवली मधील रस्ते झाले गुलाबी (Photo Credits-Twitter)

देशभरात प्रदुषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मुंबईत प्रदुषणामुळे हवेचा दर्जा खालावला जात असल्याची बाब समोर आली होती. तर ग्रीनपीस इंडिया यांच्या अहवालामध्ये महाराष्ट्रातील मुंबई हे सर्वात प्रदुषित शहर असल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभुमीवर पावसाळ्याच्या दिवसात डोंबिवली येथील परिसरात रासायनिक कंपन्या असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात डोंबिवलीत कधी ऑरेंज पाऊस तर कधी हिरवा पाऊस पडल्याचे दिसून आले होते.

सध्या डोंबिवली मधील रस्ते गुलाबी रंगाचे दिसुन येत आहेत. याच परिस्थितीत एमआयडीसी मधील रस्त्यांवर केमिकल परसल्याने ते गुलाबी रंगाचे झाले आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना याचा त्रास होत असून डोळे चुरचुरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. नागरिकांनी या प्रकरणी पर्यावरण विभागकडे बोट दाखवले आहे. तर डोंबिवलीच्या प्रदुषणावर कधी नियंत्रण आणणार याची चिंता आता स्थानिकांना सातावू लागली आहे.(डोंबिवली: कोपर रेल्वे स्थानकात TC ला मारहाण करणारा प्रवासी अटकेत)

 तर पावसाळ्याचा काळात हिरव्या रंगाचा पाऊस पडला होता. त्यामुळे एमआयडीसीच्या दावडी गावातील गणेशमू्र्ती काळवंडल्या गेल्या होत्या. केमिकलयुक्त पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचा याचा त्रास सहन करावा लागतो. पण पावसाचे पाणी हिरव्यास लाल रंगाचे दिसून येते. तसेच घरातील भांड्यांवर काळ्या रंगाच्या पावडरचा थर जमा होतो. मात्र आता ऑरेंज रंगाचा पाऊस पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या पावसामुळे पाण्यावर तेलाचा तवंग दिसून येत असल्याचे आढळून आले. तसेच तेलमिश्रीत पाऊस पडल्याती बाब समोर आली होती.