Dombivli: प्रेम प्रकरणातून तरुणाने रचला स्वत:च्या अपहरणाचा कट, ऐकून तुम्ही देखील व्हाल थक्क

एवढा सगळा घाट या तरुणाने स्वत घातला असुन पोलिस तपासानंतर जे काही सत्य पुढे आलं ते ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo credit: archived, edited, representative image)

गेले काही दिवसात अपहरण करणाऱ्या टोळीबाबत अफवा तुम्ही ऐकल्या असाल पण डोंबिवलीत (Dombivli) काही अजबच प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने स्वतचं अपहरण (Kidnapping) केले. एवढा सगळा घाट या तरुणाने स्वत घातला असुन पोलिस (Police) तपासानंतर जे काही सत्य पुढे आलं ते ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. कारण या पठ्ठ्याने स्वतचं अपहरणं करुण स्वत:च्या वडिलाला मेसेज केले तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे पोलिसांना कळवल्यास बॉडी घरी येईल. तरुणाच्या कुटुंबियांनी हा मेसेज बघताचं लागलीचं पोलिस स्टेशन (Police Station) गाठलं आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तरी डोंबिवली पोलिसांनी (Dombivali Police) प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती पुढे आली.

 

मोबाईल लोकेशनच्या (Mobile Location) माध्यमातून पोलिसांनी (Police) या तरुणाचा शोध घेतल्या नंतर तब्बल दहा तासांनी या तरुणाचा पत्ता लागला. तसेच या तरुणाने स्वतचं अपहरण (Kidnapping) केलं असल्याची माहिती पुढे आली. तरी हा सगळा प्रकार प्रेम प्रकरणाच्या भानगडीतून घडल्याची माहिती पुढे आली आहे. या तरुणाचं घराजवळच्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम (One Sided Love) होत. त्याने आपल्या प्रेमाबाबत तरुणीला सांगितले पण तरुणीने नकार दिल्याने हा थेट तिच्या घरी पोहचला. (हे ही वाचा:- Crime: अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, 16 जण अटकेत)

 

तरुणाने तरुणीच्या कुटुंबाकडे लग्नाची मागणी घातली असता तरुणाला समज देत मुलीच्या घरच्यांनी नकार दिला. मुलीसह तिच्या कुटुंबियांना धडा शिकवण्यासाठी तरुणाने हा कट रचला आणि या अपहरणाचा आळ मुलीच्या कुटुंबियांवर आणण्याचं ठरवलं पण पोलिसांच्या (Police) अचूक तपासामुळे हा सगळा धक्कादायक प्रकार पुढे आला.