डोंबिवली रेल्वे स्थानकावर 29 वर्षीय महिलेची प्रसुती
डोंबिवली (Dombivali) रेल्वे स्थानकावरच एका 29 वर्षीय महिलेची प्रसुती झाल्याची घटना घडली आहे.
डोंबिवली (Dombivali) रेल्वे स्थानकावरच एका 29 वर्षीय महिलेची प्रसुती झाल्याची घटना घडली आहे. तर गरोदर असणारी महिला लोकलमधून कामा हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी निघाली होती.
मात्र रेल्वेस्थानकात महिलेची प्रसुती झाली. महिलेला वेदना सहन न झाल्याने तिला वन रुपी क्लिनकमध्ये तेथील प्रवाशांनी घेऊन गेले. त्यानंतर तातडीने वन रुपी क्लिनिकमध्ये महिलेची प्रसुती करण्यासाठी डॉक्टर्स आणि नर्स यांनील उपस्थिती लावली. महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली असून तिने मुलाला जन्म दिला आहे.(एसटीमध्ये महिलेची प्रसुती, बाळाला तेथेच सोडून आईने काढला पळ)
तर महिलेकडून प्रसुतीसाठी 1 रुपया घेण्यात आला. वेळेवर महिलेच्या उपचारासाठी दाखल झालेल्या डॉक्टर्स आणि नर्स यांचे आभार मानले जात आहेत.