Mumbai: सांताक्रूझच्या कलिना परिसरात कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; घटना CCTV मध्ये कैद, आरोपीवर गुन्हा दाखल
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी अनैसर्गिक लैंगिक संबंधच्या आरोपाखाली आरोपीविरोधात वाकोला पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Mumbai: मुंबईतील सांताक्रूझ (Santacruz) च्या कलिना (Kalina) परिसरामधून कुत्र्यावर लैंगिक अत्याचार (Dog Sexually Abused) केल्याची घटना समोर आली आहे. तौफिक अहमद असं या आरोपीचं नाव आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी अनैसर्गिक लैंगिक संबंधच्या आरोपाखाली आरोपीविरोधात वाकोला पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अॅनिमल रेस्क्यू अँण्ड केअर ट्रस्ट (ARAC) च्या प्राणी हक्क संघटनेच्या अध्यक्षा सविता महाजन यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, आरोपी तौफिक अहमद याच्याविरोधात त्यांनी वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. या गुन्हेगारी घटनेचे सीसीटीव्ही फुटेजसह सर्व इलेक्ट्रॉनिक पुरावेही या संघटनेने पोलिसांना दिले आहेत. आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सविता महाजन यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) सुधीर कुकडळकर यांचे आभार मानले. (वाचा - धक्कादायक! ठाण्यात 40 वर्षांच्या व्यक्तीने केला कुत्रीवर बलात्कार; पोलिसांकडून गुन्हा दाखल)
सविता महाजन यांनी पुढे बोलताना सांगितले की, पोलिस निरीक्षक मिथुन पाटील यांनीही या प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात पूर्ण सहकार्य केले. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे खासगी गाड्या पार्क केल्या आहेत. एकावेळी बर्याच मोटारी असल्याने वाहनांच्या काही भागांची चोरी रोखण्यासाठी याठिकाणी सीसीटीव्ही पाळत ठेवणारे कॅमेरे लावण्यात आले होते. त्याच कॅमेऱ्यांमध्ये तौफिकने चिनो नावाच्या कुत्रीवर बलात्कार केल्याचे दिसून आले. आरोपी हा या परिसरात ब्रेड विकणारा फेरीवाला आहे. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये तो कुत्रावर बलात्कार करताना स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिस त्याला पकडण्यासाठी त्याच्या स्थानिक पत्त्यावर गेले. परंतु. तो उत्तर प्रदेशात असलेल्या वडिलोपार्जित घराकडे गेला असल्याचे पोलिसांना समजले. आरोपीविरोधात आयपीसीच्या कलम 377 (अनैसर्गित लैंगिक संबंध) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी विनंती सविता महाजन यांनी पोलिसांना केली आहे. यासाठी मुंबई पोलिस यूपी पोलिसांशी संपर्क साधत आहेत.