Cyclone Vayu मुळे मुंबई शहराला धोका नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आवाहन
हवामान खात्याने या वायू चक्रीवादळाचा मुंबई शहराला धोका नसल्याची माहिती बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.
अरबी समुद्रातील दक्षिणपूर्व भाग, लक्षद्वीप आणि मध्यपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र यावरून सध्या सोशल मीडियामध्ये अनेक उलट सुलट चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अशातच सोमवार ( 10 जून) रात्री वीजेच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाला मुंबई सह ठाणे परिसरात सुरुवात वायू चक्रीवादळाचा काही मुंबईकरांनी धसका घेतला होता. मात्र हवामान खात्याने या वायू चक्रीवादळाचा मुंबई शहराला धोका नसल्याची माहिती बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.
अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळ हे सुमारे 300 किमी आतमध्ये असल्याने त्याचा पश्चिम किनार पट्टीला धोका नाही. मात्र केवळ सुरक्षा आणि सतर्कतेचा इशारा म्हणून 11-13 जून दरम्यान मच्छिमारांनी समुद्रात जाणं टाळावं असं सांगण्यात आले आहे. दरम्यान या काळात समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढू शकतो. सध्या उन्हाने काहिली होत असलेल्या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.