District-wise New List of Guardian Ministers: पालकमंत्री पदाची नवी यादी जाहीर, कोथरुडचे दादा अमरावतीला, बारामतीचे पुण्याला

रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरुन अदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांच्यात वाद आहे.

Chandrakant Patil Vs Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

New List of Guardian Ministers: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळातील धुसफूस कायम असल्याची चर्चा असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या रुपात नाराजीनाट्याचा पाळणा उघडपणे हालताना दिसतो आहे. अशातच आता राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सुधारीत यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरुन खांदेपालट करण्यात आली आहे. खास करुन कोथरुडचे आमदार असलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पुण्यावरुन हटवत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले आहे. तर उपमुख्यमंत्री पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले गेले आहे. या खांदेपालटानंतर तरी नाराजीच्या नाकदुऱ्या निघणार का? याबाबत उत्सुकता आहे. सुधारीत पालकमंत्र्यांची यादी आपण येथे पाहू शकता.

दरम्यान, रायगड आणि सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन निर्माण झालेला पेच कायम असल्याने या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदावर कोणत्याही प्रकारे बदल करण्यात आला नाही. रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरुन अदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांच्यात वाद आहे. त्यामुळे वादाचा हा तिढा अद्याप तरी सुटला नाही परिणामी या जिल्ह्यातीचे पालकमंत्री पद हे सध्यातरी उदय सामंत यांच्याकडेच आहे. सातारा जिल्ह्याबबतही काही वेगळी स्थिती नाही.

पालकमंत्रीपदाची सुधारीत यादी (11 जिल्ह्यांसाठी

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा - सुधीर मुनगंटीवार

पालकमंत्री पदावरुन राज्यभरात उत्सुकता होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांची पालकमंत्री पदं रिक्त होती. संकेतानुसार प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन सोहळ्याला झेंडावंदन पालकमंत्र्याने करायचे असते. पण, अनेक ठिकाणी पालकमंत्री पदेच जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्याला झेंडावंदन करावे लागले होते. आता पालकमंत्री पदाचा पेच बऱ्यापैकी सुटल्याने राज्याच्या विकासाला गती येईल अशी आशा सामान्याकडून व्यक्त होत आहे.