Dhananjay Munde Allegation Case Update: धनंजय मुंडे यांना दिलासा, तक्रारदार महिलेकडून तक्रार मागे; भाजपकडून महिलेच्या चौकशीची मागणी
त्यामुळे ती मानसिक दबावाखाली आहे. या सर्व प्रकरणामध्ये माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीतरी मुंडे यांना लक्ष्य करत आहे. जे घडते आहे ते वाईट आहे
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने आपली तक्रार मागे ( Complaint Withdrawn) घेतल्याचे वृत्त आहे. या घटनेचे राजकारण होत असल्याने आणि इतर काही कौटुंबिक कारणांमुळे आपण ही तक्रार मागे घेत असल्याचे संबंधित महिलेने म्हटले आहे. तक्रार मागे घेण्यात आल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना मोठाच दिलासा (Dhananjay Munde Relief in Allegations Case) मिळाला आहे. संबंधित महिलेने तक्रार मागे घेत असल्याबाबत तसा अर्जही महिलेने पोलिसांत केला. त्यानंतर ही तक्रार आपण मागे घेतली आहे. मुंडे यांच्यावर केलेले आरोप खोटे असतील तर संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तिची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून दुरावा आहे. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली आहे. या सर्व प्रकरणामध्ये माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीतरी मुंडे यांना लक्ष्य करत आहे. जे घडते आहे ते वाईट आहे. त्यामळे आपण ही तक्रार मागे घेत असल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. (हेही वाचा, Dhananjay Munde Allegation Case: धनंजय मुंडे यांच्यावरी आरोप प्रकरणात महिलेने माघार घेतल्याचे वृत्त, ट्विट करुन दिली माहिती)
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे तक्रारदार महिलाच आपली तक्रार मागे घेत असेल तर हे प्रकरण पुढे वाढवले जाणार नसल्याचे पोलिस सूत्रांनी म्हटले आहे. मात्र, संबंधित महिलेने तक्रार मागे घण्याबाबत अर्ज दाखल केला असला तरी, तिच्याकडून तसे प्रतिज्ञापत्र घेणार असल्याचे पोलिसांनी म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या आधारे दिला आहे.
या सर्व प्रकरणात आता भारतीय जनता पक्षाने नवी भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर संबंधित महिलेने जर खोटे आरोप केले असतील तर तिची चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकारे आरोप करुन एखाद्या माणसाचे राजकीय आयुष्य जर उद्ध्वस्त केले जात असेल तर ते अत्यंत वाईट आहे. त्यामुळे पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल करुन चौकशी करायला हवी अशी मागणी भाजपने केली आहे.