Dhairyasheel Mohite Patil: धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या राष्टवादीत प्रवेश, माढ्यातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब
कार्यकर्त्यांकडून सुद्धा दबाव सुरू होता. या सर्व पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
राज्यातील सर्वात चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ आहे. भारतीय जनता पार्टीत असलेल्या मोहिते पाटील यांनी उमेदवारी नाकारल्यामुळे आता बंडाचे निशाण उगारले आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सर्वाधिक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू होती, त्याला आज पूर्णविराम मिळाला असून धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माढ्यातून रिंगणात असलेल्या भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. (हेही वाचा - Congress on BJP Manifesto for Lok Sabha Elections 2024: भाजपच्या जाहीरनाम्यात महागाई आणि बेरोजगारीकडे दुर्लक्ष, राहुल गांधींची भाजपवर टीका)
गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील पाटील हे तुतारी हातामध्ये घेणार अशी चर्चा रंगली होती. कार्यकर्त्यांकडून सुद्धा दबाव सुरू होता. या सर्व पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी राहणार आहेत. संजीवराजे निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर सुद्धा शरद पवार गटाला साथ देणार आहेत. त्यामुळे माढ्यामध्ये राजकीय चित्र पूर्णतः पालटून गेलं आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा पूर्वाश्रमीचे भाजपचे कट्टर नेते उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्रित येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.