Ganpati Visarjan 2021: लाडक्या बाप्पाला आज निरोप! गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईत कडक बंदोबस्त
आजच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी (Anant Chaturthi 2021) प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पाचा निरोप घेत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2021) आज शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी (Anant Chaturthi 2021) प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पाचा निरोप घेत आहेत. दरम्यान, घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडाळातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने (BMC) लागू केलेल्या निर्बंधांनुसर गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत
गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेने 73 नैसर्गिक आणि 173 कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. तर, 24 विविध विभागांमध्ये मुंबईतील जनतेची सेवा करण्यासाठी सुमारे 25,000 संबंधित कर्मचारी-कर्मचारी विविध ठिकाणी उपस्थित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विसर्जन स्थळांवर तब्बल 715 जीवरक्षक तैनात आहेत. तसेच त्या ठिकाणी 39 रुग्णवाहिका आणि 36 मोटरबोट आवश्यक सेवांसाठी समुद्राच्या पातळीवर ठेवण्यात आल्या आहेत. हे देखील वाचा- Kasba Peth Visarjan 2021: पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींपैकी पहिल्या कसबा गणपती चं विसर्जन संपन्न (Watch Video)
लालबाग, परळ, गिरगाव, जुहू, वर्सोवा, पवई, मध, मार्वे, अक्सा बीच, दादर चौपाटीसह मुंबईतील 55 हून अधिक रस्ते शहराच्या वाहतूक पोलिसांनी एकमार्गी रस्त्यात रूपांतरित केले. विसर्जन सोहळ्यासाठी दक्षिण मुंबई वाहतूक विभागाअंतर्गत 21 रस्ते बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान, गणेश गल्लीतील मुंबाईचा राजा मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील गिरगाव चौपाटी येथील विसर्जन सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.