26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदार Devika Rotawan ची हायकोर्टात धाव; सरकारकडे घर व शिक्षणासाठी मदतीची मागणी

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (26/11 Terrorist Attacks) वाचलेली सर्वात कमी वयाची व्यक्ती व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, देविका रोटवन (Devika Rotawan - 21) हिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

26/11 Terror Attack (Photo Credit: Getty Images)

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (26/11 Terrorist Attacks) वाचलेली सर्वात कमी वयाची व्यक्ती व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, देविका रोटवन (Devika Rotawan - 21) हिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिच्या गरीब कुटुंबाला राहण्यासाठी घर देण्याचे तसेच तिच्या पदव्युत्तर शिक्षणाची तरतूद करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला देण्याची मागणी तिने कोर्टासमोर केली आहे. देविका सध्या आपल्या कुटुंबासह मुंबईच्या वांद्रे (पूर्व) येथील सुभाष नगरातील चाळीतील खोलीत राहत आहे. मात्र तीव्र आर्थिक अडचणीमुळे राहत्या घराचे दरमहा भाडे देणेही शक्य नसल्याने, तिचे कुटुंबीय बेघर होण्याची भीती तिने याचिकेत व्यक्त केली आहे.

देविका हिने वकील उत्सव बैन्स यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. याबाबत ती म्हणते, बऱ्याच शारीरिक तक्रारींमुळे तिचे वडील व भाऊ यांना उपजीविका मिळवणे शक्य नव्हते आणि आता घराचे मासिक भाडे देणेही त्यांना शक्य नाही. नुकतेच वांद्रे येथील चेतना कॉलेजमध्ये मानवतेच्या (Humanities) पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या आणि नागरी सेवांमध्ये करिअर करण्याचा विचार असलेली देविका 2008 च्या मुंबई हल्ल्यावेळी 9 वर्षांची होती.

त्यावेळी लष्कर-ए-तैयबाच्या दोन अतिरेक्यांनी अतिशय गर्दी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्या गोळीबारात देविकाच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती. त्यानंतर दीड महिन्यात तिच्यावर 6 शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या व पुढे सहा महिने ती बेड रेस्ट घेत होती.

याचिकेमध्ये पुढे देविका म्हणते, मुंबई हत्याकांडानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक प्रतिनिधींनी त्यांच्या चाळीतील खोलीला भेट दिली होते व घरच्या गरिबीमुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (ईडब्ल्यूएस) कोटा अंतर्गत निवास देण्याचे आश्वासन दिले होते. तिने दावा केला की, अधिकाऱ्यांनी तिच्या शिक्षणाची पुरेशी व्यवस्था करण्याची आणि तिच्या वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असेल ती आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आपण इतक्या मोठ्या हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी असून व अनेक आश्वासने देऊनही आपल्याला मदत मिळाली नाही.

सर्व प्रकारची दिलेली आश्वासने ही 26/11 चा खटला चालू होईपर्यंत पोकळ असल्याचे लक्षात आल्याचेही तिने याचिकेत नमूद केले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या आश्वासनानुसार आपल्या घराची व शिक्षणाची व्यवस्था सरकारने करावी अशी देविकाची अपेक्षा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif