Devendra Fadnavis Tweet: डुकरासोबत कुस्ती खेळू नये, देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट; टीकाकारांवर अप्रत्यक्ष निशाणा
महाविकासआडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. खळबळजनक आरोप करुन फडणवीस यांना उत्तर देण्यास प्रवृत्त केले आहे.
महाविकासआडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. खळबळजनक आरोप करुन फडणवीस यांना उत्तर देण्यास प्रवृत्त केले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर ट्विटरवर खातनाम लेखक बर्नार्ड शॉ (George Bernard Shaw) यांचे एक विधान शेअर केले आहे. 'आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलोय', असे देवेंद्र यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष पलटवार केल्याची चर्चा या ट्विटनंतर रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बर्नार्ड शॉ यांचे विधान ट्विटरवर शेअर केले आहे. इंग्रजीत ट्विट असलेल्या या विधानाचे मराठी रुपांतर इथे देत आहोत. फडणवीस यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या विधानाचा थोडक्यात अर्थ असा की ''आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलोय. डुकरासोबतची कुस्ती आपल्याला घाण करते आणि तेच डुकराला आवडतं''. (हेही वाचा, Nawab Malik On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचा धंदा; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप)
नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध आहेत. नोटबंदीच्या काळात त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचा धंदा (Counterfeit Notes Business in Maharashtra) सुरु होता, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपांवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.
ट्विट
दरम्यान,नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना म्हटले की, देशात 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी नोटबंदी झाली. त्यानंतर देशात अनेक राज्यांमध्ये बनावट नोटा पकडण्यात आल्या. महाराष्ट्रात मात्र 8 ऑक्टोबर 2016 पर्यंत एकही बनावट नोट पकडण्यात आली नाही. 8 ऑक्टोबर 2017 या दिवशी महाराष्ट्रात 14 कोटी 56 लाख रुपयांच्या नोटा पकडण्यात आल्या. मात्र, हे प्रकरण दबण्यासाठी फडणवीस यांनी मदत केली. या बनावट नोटांचं नेक्सस दाऊद, बांग्लादेश आणि पाकिस्तानपर्यंत असल्याचेही नवाब मलिक यांनी म्हटले.
बनावट नोटांंप्रकरणी इम्रान आलम शेख नामक एका व्यक्तीस अटक झाली. पुणे येथून रियाज शेख याला अटक झाली. नवी मुंबईतूनही एकाला अटक झाली. मात्र, पुढे 14 कोटी रुपयांच्या जप्त करण्यात आलेल्या नोटांना 8 लाख 80 हजार रुपयांचे प्रकरण दाखवून दाबण्यात आले. पाकिस्तानातून पुरवल्या जाणाऱ्या नोटा भारतात सुरु राहव्यात यासाठीच हे प्रयत्न सुरु होते का? असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)