Devendra Fadnavis: महाविकास आघाडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्त्युत्तर म्हणाले..
तरी या सगळ्या टिकेंवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सुचक शैलीत प्रत्त्युत्तर दिल आहे.
महाविकास आघाडीकडून आज मुंबईत भव्य दिव्य महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप नेत्यांसह राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान त्याचप्रमाणे कर्नाटक सीमावादाचा सुरु असलेला प्रश्न या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं होतं. तसेच या मोर्चात महाविकास आघाडीतील विविध बड्या नेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत राज्य सरकारवर हल्ला चढवला. राज्यातील विविध प्रश्नांवर बोट ठेवत भाजपसह शिंदे गटाला महाविकास आघाडीने खोचक टोला लगावला आहे. तरी या सगळ्या टिकेंवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सुचक शैलीत प्रत्त्युत्तर दिल आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा आहे. कारण जे लोकं संतांना शिव्या देतात, देवदेवतांना शिव्या देतात, वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे त्यांना माहिती नाही, तो कुठल्या साली झाला हे माहिती नाही, अशा प्रकारे ही जी मंडळी कोणत्या तोंडाने आज मोर्चा काढत आहेत? असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर निशाणा साधला आहे. (हे ही वाचा:- Mahavikas Aghadi Mahamorcha: महाविकास आघाडीच्या महामोर्चात विविध नेत्यांचा सहभाग, पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले..)
तरी फडणवीसांनी आपल्या प्रतिक्रयेत उध्दव ठाकरेंना मिश्किल टोला लगावला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ज्यांना स्वतःचं सरकार टिकवता आलं नाही, त्यांच्या नाकाच्या खालून आम्ही हे सरकार घेऊन गेलो. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार टिकेल की नाही यावरु भाष्य करु नये. तर शिंदे फडणवीस सरकार टिकेल आणि पुन्हा सत्तेत देखील येईल असा दावा फडणवीसांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र येऊन देखील मोर्चास गर्दी जमवू शकले नाहीत, हे आजच्या मोर्चाचं अपयश असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.