Devendra Fadnavis on CM Face 2024: मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान; एकनाथ शिंदे गटात खळबळ

या वक्तव्यावरुन एकनाथ शिंदे गटाच चांगलीच खळबळ माजली असून टोकाची अस्वस्थता पसरल्याचे समजते.

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Assembly Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मस Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा भाजप (BJP) यांच्यात कितीही अलबेल असल्याचे सांगितले जात असले तरी वास्तव काही वेगळेच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हे प्रकर्षाने पुढे आले आहे. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये शिवसेना-भाजप युतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरुन एकनाथ शिंदे गटाच चांगलीच खळबळ माजली असून टोकाची अस्वस्थता पसरल्याचे समजते.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणूक 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील. सहाजिक आहे जो मुख्यमंत्री असतो तोच त्याच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते. मात्र निवडणुका नेतृत्वात लढवल्या जाणे आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं किंवा मुख्यमंत्री निवडला जाणे या वेगवेगळ्या गोष्टी असतात. मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्याचा निर्णय वरिष्ठ घेत असतात. त्याबाबत पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनाच विचारायला हवं. पक्षनेतृत्वाला त्या वेळी वाटलं की, मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलायचा आहे. तर ते त्या वेळी तसा निर्णय घेऊ शकतात. पण, मला वाटत नाही तसा काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis on Thackeray and Pawar: शरद पवार यांनी डबल गेम केला, उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसला- देवेद्र फडणवीस)

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेणे हा भाजपचा तत्कालीन निर्णय होता, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्याला देवेंद्र फडणीस यांच्या विधानामुळे बळकटी आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, देवंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता. सध्या आपण जेथे आहोत तेथेच खूश आहोत. केंद्रात जाण्याचा कोणता विचार सध्यातरी नाही, असे देवंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. सर्वच काही अलबेल नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दुसऱ्या बाजूला फडणवीस यांच्या विधानामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर दिलेल्या जाहीरातमुळे भाजपमध्येही अशीच अस्वस्थता पाहायला मिळत होती. त्याच पद्धतीची अस्वस्थता आता शिंदे गटात पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे.