आपला लढा आकडेवारीशी नाही तर, कोरोनाविरोधात आहे; देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला टोला
महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शुक्रवारी 24 तासात 8 हजार 381 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती दिली होती.
महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शुक्रवारी 24 तासात 8 हजार 381 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती दिली होती. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात काल एकाच दिवशी 8 हजार 381 रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, त्याच दिवशी राज्यात सर्वाधिक 116 मृत्यूची नोंदही झाली आहे. आपला लढा आकडेवारीशी नाही, तर करोनाविरोधात आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करा, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच शुक्रवारी 24 तासात 8 हजार 381 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती दिली होती. तसेच सध्याच्या घडीला महाराष्ट्रात 33 हजार 124 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर, 26 हजार 997 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्याचा आपला रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 43 टक्के इतके आहे. तर मृत्यूदर हा 3.3 टक्के आहे असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरला एका मराठी वृत्तपत्राची बातमी शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “काल एकाच दिवशी 8 हजार 381 रूग्ण घरी सोडण्यात आल्याचा दावा आणि मृत्यूसंख्या आजवरची सर्वाधिक 116. रूग्ण बरे होत आहेत हे दाखवण्याचा घाईत मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. आपला लढा आकडेवारीशी नाही, तर करोनाविरोधात आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करा अशी विनंती”अशा आशायाचे त्यांनी ट्विट केले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र: सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास पहिल्या वेळेस 1 हजार रुपयांच्या दंडासह एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 62 हजार 228 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 26 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यापैकी 2098 रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)