Nawab Malik On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध - नवाब मलिक

सहारा विमानतळावर बनावट पासपोर्टसह सापडलेला (29 ऑक्टोबर) रियाज भाटी हा कोण आहे? देवेंद्र फडणवीसांचे रियाज भाटीशी संबंध काय? असा सवाल मलिक यांनी फडणवीस यांना विचारला.

Nawab Malik On Devendra Fadnavis | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Mali) यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने राज्यात बनावट नोटांचे रॅकेट चालू होते असा आरोप करतानाच त्यांनी गुन्हेगारांनाही राज्यात सरकारी पदांवर बसवून संरक्षण दिले, असे मलिक यांनी म्हटले. रियाज भाटी हा अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. हा भाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचलाच कसा? त्यासाठी कोणी प्रयत्न केले, असे सवालही मलिक यांनी उपस्थित केले.

देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध आहे. सहारा विमानतळावर बनावट पासपोर्टसह सापडलेला (29 ऑक्टोबर) रियाज भाटी हा कोण आहे? देवेंद्र फडणवीसांचे रियाज भाटीशी संबंध काय? असा सवाल मलिक यांनी फडणवीस यांना विचारला. रियाज भाटी हा कोण आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्याला विमानतळावर बनावट पासपोर्टमध्ये पकडल्यावर त्याला दोन दिवसांमध्ये कसे सोडले जाते? तो पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये कसा काय दिसत होता? पंतप्रधानांपर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तिची आगोदर स्क्रुटनी होते. त्यानंतरच तो व्यक्ती पंतप्रधानांपर्यंत पोहोचतो. स्क्रुनिटीशिवाय रियाज भाटी हा पंतप्रधानांपर्यंत पोहोचलाच कसा, असा सवाल मलिक यांनी विचारला. (हेही वाचा, Nawab Malik On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचा धंदा; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप)

माझ्यावर लावलेल्या आरोपांचा मी खुलासा केला. मात्र, आपण मुख्यमंत्री असताना सलीम पटेल यांच्याबाबत आपल्याला माहिती होती किंवा नाही? असा सवालही मलिकांनी विचारला. शिवाय आम्ही जेव्हा 2005 मध्ये व्यवहार केला तेव्हा मी पदावर नव्हतो. आम्ही संपत्ती केली त्यानंतर सलीम पटेल याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पाचच महिन्यांपूर्वी आम्हाला माहिती कळाली की त्याचा मृत्यू झाला आहे. शाहवली खानसोबत आमचा व्यवहार झाला. हा व्यवहार 2005 मध्ये झाला. त्या वेळी तो आरोपी नव्हता. शाहवली हा तिथल्या वॉचमनचा मुलगा होता. त्या जागेवर त्याने स्वत:चे नाव लावले होते. ते नाव काढण्यासाठी आम्ही त्याला पैसै दिले हे आम्ही नाकारत नाही, असे मलिक यांनी म्हटले.