Devendra Fadnavis उद्विग्न, म्हणाले 'पक्षाने सांगितले तर चपरासी होईन'
मात्र, पक्षाने उपमुख्यमंत्री होण्यास सांगितले हा मोठा धक्का होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Devendra Fadnavis on DCM: एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय केल्यानंतर स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होण्याचा आपला कोणताही विचार नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी शिंदे यांचे नाव पक्षाला आपण सूचवले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र, पक्षाने आपल्याला उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला सांगणे हा आपल्यासाठी मोठा धक्का होता. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आपल्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणं हे कठीण होतं. परंतू, हा पक्षाचा आदेश आहे. पक्षाने आदेश दिला तर आपण 'चपरासी' व्हायला देखील तयार आहोत, असे उद्विग्न उद्गार फडणीस यांनी काढले आहेत. 'खुपते तिथे गुप्ते' या एका टीव्ही कार्यक्रमात देवेंद्रे फडणवीस बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात आणि विशेषत: त्यांना मानणाऱ्या समर्थकांना मोठा बसण्याची शक्यता आहे.
बहुसंख्ये आमदार असताना सत्तेबाहेर राहणे आणि विचारांशी तडजोड करुन मविआमध्ये राहणाऱ्या हिंदुत्त्ववादी मंडळींचा श्वास गुदमरत असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे हिंदुत्त्ववादी लोकांनी एकत्र यायला पाहिजे असे आम्हा सर्वांनाच वाटत होते. त्यातून आम्ही पावले टाकण्यास सुरुवात केली, अशा आशयाचे विधान फडणवीस यांनी केले. ते म्हणाले हिंदुत्त्वादी मंडळींना सोबत घेऊ सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री होण्याची मला अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे ते पद शिंदे यांना द्यावे, यासाठी आपण पक्ष नेतृत्वाला कळवले. या निर्णयासाठी नेतृत्वाला तयार करण्यासाठी आमचा काही काळ निश्चितच गेला. मात्र निर्णय झाल्यावर कृती घडल्याचेही फडणीस यांनी अप्रत्यक्ष बोलून दाखवले. (हेही वाचा, Ajit Pawar Banner: वर्षा बंगल्याच्या परिसरात झळकले अजित दादाचें बॅनर, मजकूरात लिहले.. जनतेच्या मनातले मुख्यमंत्री)
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासाघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात मुख्यमंत्री होणार कोण? असा जेव्हा प्रश्न विचारला जात असे तेव्हा देवेंद्र फडणवीस हेच एकमुखी नाव होते. कोणालाही असे वाटले नव्हते की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. दरम्यान, शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर झाले तरीही देवेद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री जाईल असे सूतराम शक्यताही कोणाला वाटली नव्हती. पण असे घडले खरे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आले. भाजप समर्थकांना हा नेतृत्वाचे धक्कातंत्र वाटते. देवेंद्र फडणवीस समर्थकांना हा अन्यायय वाटतो. तर राजकीय विरोधकांना वाटते हे फडणवीस यांचे पक्षांतर्गत आणि नेतृत्वाचे केलेले खच्चीकरण आहे. दिल्लीतील नेतृत्वाने फडणीस यांचे पंख छाटण्याचे या निर्णयाने केल्याचे वाटते.