Monsoon 2020: वाढत्या उन्हाच्या झळांपासून लवकरच होणार मुंबईकरांची सुटका; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मान्सून पूर्व पाऊस बरसणार
त्यामुळे सर्वांना पावसाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. दरम्यान हवामान खात्याने पावसासंबंधित दिलासादायक माहिती दिली आहे.
मे महिना म्हणजे उकाड्याचे दिवस. महिन्याभरापासून वाढणाऱ्या तापमानामुळे देशभरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वांना पावसाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. दरम्यान हवामान खात्याने पावसासंबंधित दिलासादायक माहिती दिली आहे. मान्सुनच्या (Monsoon) आगमनासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने केरळमध्ये (Kerala) 1 जूनपासून मान्सूनला सुरुवात होईल. 31 मे ते 4 जून दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ किनारपट्टीवर मान्सुनला सुरुवात होऊ शकते. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे.
स्कायमेट वेदरने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पूर्व पाऊस बरसेल. तर 2-4 जून दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Rain in Mumbai: मुंबई शहरातील मुलुंड परिसरात पावसाचा मध्यरात्री शिडकाव)
ट्विट:
8 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून लवकरच मान्सून पूर्व पावसालाही सुरुवात होईल, असेही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत मान्सून आगमन झाल्यानंतर मुंबईत 11 जून पर्यंत मान्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे. काल (शुक्रवार, 29 मे) मुंबईतील मुलुंड येथे पावसाचा शिडकाव झाला.