Dengue, Swine flu in Nashik: नाशिक मध्ये डेंगी, स्वाईन फ्लू च्या रूग्णात वाढ; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर

डासांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि डेंग्यूचे रूग्ण रोखण्यासाठी कूलर आणि कंटेनरमधून साचलेले पाणी नियमितपणे रिकामे करण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.

Fever | Pixabay.com

नाशिक (Nashik) मध्ये पावसाळा सुरू झाला आणि आजारांनीही डोकं वर काढलं आहे. डेंग्यू (Dengue) सोबतच आता स्वाईन फ्लू चे देखील रूग्ण समोर येत आहेत. नाशिक मध्ये दोघांचा स्वाईन फ्लूने (Swine flu) मृत्यू झाला आहे. तर 31 जण बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी नाशिक मध्ये डेंगूने ही रूग्णाचा बळी गेला आहे. दोन दिवसांपूर्वीच डेंग्यूची लागण झालेला रूग्ण उपचारा दरम्यान मृत्यूमुखी पडला असल्याने आता नाशिक च्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

नाशिक मध्ये डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी धूर फवारणी योग्य पद्धतीने होत नसल्याची माहिती समोर आली आहे. काही नागरिकांनी औषधी धूर फवारणी होत नसल्याचा आरोप केला आहे.

वाढता आजारांचा उद्रेक पाहता आरोग्य अधिकाऱ्यांनी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गोविंदनगर आणि आसपासच्या भागात घरोघरी जाऊन तपासणी मोहीम सुरू केली आहे. डेंग्यू विशेषत: सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये शिगेला पोहोचतो, परंतु या वर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळातच सार्वजनिक आरोग्याच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या वर्षी, नाशिकमध्ये डेंग्यूचे 1,191 रूग्ण समोर आले होते. ज्यात डिसेंबर 2023 मध्ये तीन मृत्यूंचा समावेश होता. आता महापालिकेच्या मलेरिया विभागाने धूर आणि जंतूनाशक फवारणी यासारख्या तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत.

डासांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि डेंग्यूचे रूग्ण रोखण्यासाठी कूलर आणि कंटेनरमधून साचलेले पाणी नियमितपणे रिकामे करण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement