मुंबई: धावती लोकल पकडताना आयटी इंजिनिअरचा मृत्यू; दादर रेल्वेस्थानकातील घटना

सुदर्शनच्या खिशात असलेल्या पाकीट आणि मोबाईलवरुन पोलिसांनी त्याच्या घरच्यांना अपघाताबाबत माहिती दिली.

सुदर्शन सुजीतकुमार चौधरी (संपादित प्रतिमा)

'प्रवाशांनो सावधान! लक्षात ठेवा. धावत्या ट्रेनमध्ये चढू किंवा उतरु नका. असे करणे आपल्या आयुष्यासाठी धोकादायक ठरु शकते', अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केली जाते. '..पण, लक्षात कोण घेतो' या म्हणीप्रमाणे अनेकजण त्याकडे उद्दामपणे दुर्लक्ष करतात. असाच उद्दामपणा एका आयटी अभियंत्याच्या जीवावर बेतला. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर रविवारी (७ ऑक्टोबर) ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

सुदर्शन सुजीतकुमार चौधरी (वय ३२ वर्षे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पेशाने तो अभियंता होता. मुळचा नागपूरचा असलेला सुदर्शन कर्जतला जाण्यासाठी दादरला आला होता. दरम्यान, फलाट क्रमांक एकवरुन त्याने धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकलने वेग घेतल्यामुळे तो फलाटावर फेकला गेला. जखमी अवस्थेत असलेल्या सुदर्शनला सीआरपीएफ जवानांनी त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

सुदर्शनच्या खिशात असलेल्या पाकीट आणि मोबाईलवरुन पोलिसांनी त्याच्या घरच्यांना अपघाताबाबत माहिती दिली.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Maharashtra Assembly Elections 2024: निवडणूक काळात दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक बातमीवर निवडणूक आयोग ठेवणार लक्ष; माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत

Amit Shah's Bag Check By EC: निवडणूक अधिकाऱ्यांकडून हिंगोलीत अमित शहा यांच्या बॅगची तपासणी, पहा व्हिडिओ

Consensual Sex With Minor Wife Is Rape: अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने लैंगिक संबंध ठेवणे हाही बलात्कारच; Bombay High Court चा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रातील 12 लाखांहून अधिक कामगार विधानसभा मतदानापासून वंचित राहू शकतात; ऊस तोडणी संघटनेने व्यक्त केली चिंता