DEAR DIWALI BUMPER Lottery 2020: डिअर दिवाळी बंपर लॉटरी निकाल यंदा 14 नोव्हेंबरला; तिकीट दर, बक्षिसाची किंमत आणि निकाल कसा पहाल?

तर या लॉटरीमधील पहिलं बक्षीस 5 कोटींचं आहे. दोघा जणांना पहिलं बक्षीस जिंकता येणार आहे. तर दुसरं बक्षीस 1 कोटीचं आहे. त्याची देखील 2 बक्षीसं देण्यात येणार आहेत.

Lottery | (Photo Credits: Pixabay)

डिअर दिवाळी बंपर लॉटरीचा (DEAR DIWALI BUMPER Lottery) निकाल यंदा 14 नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या (Diwali) दिवशी आणि लक्ष्मी पुजनेच्या (Laxmi Pujan) वेळेत लागणार आहे. यंदा दिवाळीच्या दिवशी तुम्हांला लॉटरीच्या तिकीटामधून धनलाभ होतो का हे पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर 14 नोव्हेंबरच्या संध्याकाळी हा निकाल जाहीर होणार असल्याने तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे. दरम्यान नागालॅन्ड सरकार कडून स्टेट लॉटरीच्या अंतर्गत येणार्‍या ता डिअर लॉटरीचं तिकीटं आता उपलब्ध आहेत. तुम्ही अगदी घरबसल्या देखील हे तिकीट ऑर्डर करू शकतात. डियर दिवाळी बंपर लॉटरी तिकीटची घरपोच सोय देखील सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मुंबई, पुणे सह महाराष्ट्रात उपलब्ध आहे. तर या तिकीटाचा निकाल 14 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजता या संकेतस्थळावर, युट्युब चॅनेलच्या लिंकवर ही पाहता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Dear Lottery Free Home Delivery: खुशखबर! सरकारमान्य 'डियर लॉटरी' ची महाराष्ट्रात मिळणार मोफत घरपोच डिलिव्हरी, बंपर बक्षिसाची किंमत 5 कोटी.

डियर दिवाळी बंपर लॉटरीचं तिकीट हे 2000 रूपयाचे आहे. तर या लॉटरीमधील पहिलं बक्षीस 5 कोटींचं आहे. दोघा जणांना पहिलं बक्षीस जिंकता येणार आहे. तर दुसरं बक्षीस 1 कोटीचं आहे. त्याची देखील 2 बक्षीसं देण्यात येणार आहेत.

डिअर दिवाळी बंपर लॉटरी वेळापत्रक

लॉटरी - नागालॅंड सरकार स्टेट लॉटरी

लॉटरी तिकीट - DEAR DIWALI BUMPER Lottery

लॉटरी निकाल तारीख / वेळ - 14 नोव्हेंबर रात्री 8 वाजल्यापासून

कुठे पहाल ऑनलाईन निकाल- nagalandlotteries.com

1991 पासून डियर लॉटरीज भारताच्या विविध राज्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान त्यांचे निकाल टेलिव्हिजन आणि डिजिटल माध्यमातून खुलेपणाने जाहीर करणारी ही पहिली लॉटरी आहे. तसेच ही सराकारमान्य असल्याने सामान्यांमध्ये त्याच्याबद्दल खात्री आहे. Asia Pacific Lottery Association चा डियर लॉटरी हा एक भाग आहे. तर 2001 पासून World Lottery Association चादेखील सदस्य आहे.